Wednesday, April 30, 2025
Homeधुळेसावळदे पुलावर अपघात, कठडे तोडून ट्रक तापीत

सावळदे पुलावर अपघात, कठडे तोडून ट्रक तापीत

धुळे- dhule

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर तालुक्यातील सावळदे तापी नदी पुलावर मजूर घेऊन जाणाऱ्या भरधाव क्रुझर (Cruiser) वाहनाचा अचानक टायर फुटल्याने वाहन उलटून अपघात (Accident) झाला. त्याच दरम्यान मागून येणाऱ्या अज्ञात अवजड भरधाव ट्रक वाहनावरील (truck) चालकाचे नियंत्रण सुटल्याने ते वाहन पुलाचे कठडे तोडून तापी (Tapit river) पात्रात कोसळले.

- Advertisement -

एमपी ०९ एफ ए ६४८७ क्रमांकाचे क्रुझर वाहन वैजापूर येथून मजूर घेऊन मध्यप्रदेश राज्यातील सेंधवाकडे जात होते. त्यादरम्यान आज दि २३ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

क्रुझर वाहनातील जखमीमध्ये विक्रम हातु मोरे, संध्या विक्रम मोरे (वय 4), सुभाष भिकला देवरे यांचा समावेश आहे.

क्रुझरमधील मजूर किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अंधार तापीत कोसळणारे वाहन नेमके कोणत आहे. याबाबत ठोस माहिती मिळु शकलेली नाही. घटनास्थळी पुलाचे कठडे तुटल्याचे दिसून येत आहे. घटनास्थळी शिरपूर शहर व नरडाणा पोलिसांनी दाखल होत मदत कार्य केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

माजी आमदार लहानू अहिरे यांचे निधन

0
अंतापूर । वार्ताहर Antapur बागलाण विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार लहानु बाळा अहिरे (95) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी जाड (ता. बागलाण) येथील...