Friday, May 1, 2026
HomeनगरAccident News : राहुरी विद्यापीठाजवळील अपघातात जखमी महिलेचा मृत्यू

Accident News : राहुरी विद्यापीठाजवळील अपघातात जखमी महिलेचा मृत्यू

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी कृषी विद्यापीठाजवळ नगर-मनमाड महामार्गावर 2 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या वेळी झालेल्या एका भीषण रस्ता अपघातात गंभीर जखमी झालेल्या 50 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सुमन सुभाष पोपळघट, रा. सावळी विहीर, ता. राहाता, असे मृत महिलेचे नाव आहे.

- Advertisement -

सुमन पोपळघट ह्या दि. 2 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री साडे अकरा वाजे दरम्यान राहुरी कृषी विद्यापीठाजवळून जात असताना त्यांचा अपघात झाला होता. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने अहिल्यानगर येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात उपचार सुरू असताना त्या मयत झाल्या.

याप्रकरणी रुग्णालयातून प्राप्त झालेल्या अहवालानुसार राहुरी पोलीस ठाण्यात आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विकास वैराळ हे करत आहे.

ताज्या बातम्या

२ मे रोजी जाहीर होणार इयत्ता बारावीचा निकाल

0
पुणे । प्रतिनिधी Pune राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी/मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी लेखी परीक्षेचा निकाल , शनिवारी 2 मे...