Thursday, June 11, 2026
HomeनाशिकNashik News : आदित्य ठाकरेंच्या ताफ्यातील वाहनाला अपघात; एक जण जखमी

Nashik News : आदित्य ठाकरेंच्या ताफ्यातील वाहनाला अपघात; एक जण जखमी

नाशिक | Nashik

युवासेनाप्रमुख आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे महाराष्ट्र स्वाभिमान दौऱ्याच्या निमिताने दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर (Nashik Tour) आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस असून त्यांची आज येवल्यात सभा झाली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह सरकारवर विविध मुद्द्यांवरून सडकून टीका केली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Aaditya Thackeray : राज्य सरकारकडून फक्त ‘खोके दो, धोके लो’ योजना सुरु; आदित्य ठाकरेंचा घणाघात

त्यानंतर आदित्य ठाकरे येवल्याची सभा आटोपून मनमाड (Manmad) शहराकडे सभेसाठी जात असताना त्यांच्या ताफ्यातील एका गाडीचा अपघात (Accident) झाल्याची घडली घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यामागे असलेल्या दुचाकीस्वाराने एका कारला धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. या अपघातात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला असून दुचाकीच्या धडकेने कारच्या काचा फुटल्या आहेत. आदित्य ठाकरेंच्या कार्यकर्त्यांची ही कार असल्याचे समजते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राहुरीसह अन्य कृषी विद्यापीठांतील पद भरतीचा मार्ग मोकळा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्यातील कृषी विद्यापीठांच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी मिळाली आहे. तब्बल 23 वर्षांनंतर विद्यापीठांच्या अ आणि ब संवर्गातील एकूण 3,723 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता...