Saturday, March 29, 2025
Homeनगरदोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

महिलेसह एका युवकाचा समावेश

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दोन वेगवेगळ्या अपघातात एका महिलेसह युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. नगर-सोलापूर महामार्गावरील थेडगावजवळ झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. सविता एकनाथ काळोखे (वय 50 रा. हाटवन औरंगपुर, ता. आष्टी, जि. बीड) असे मयत महिलेचे नाव आहे. सविता काळोखे यांचा शुक्रवारी (5 जुलै) नगर-सोलापूर रस्त्यावर थेडगावजवळ अपघात झाल्याने त्यांना दुपारी साडेतीनच्या सुमारास उपचारासाठी नगर शहरातील खासगी रूग्णालयात दाखल केले होते.

- Advertisement -

तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा शनिवारी (6 जुलै) सकाळी 8:35 वाजता मृत्यू झाला. तशी माहिती रूग्णालयातील डॉक्टरांनी कोतवाली पोलिसांना दिली असून पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार पी. व्ही. खराडे करत आहेत. नगर शहरातील महात्मा फुले चौकातील सहकार सभागृहाजवळ झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला. साहिल अशोक पोपटानी (वय 18, पत्ता नाही) असे मयत युवकाचे नाव आहे. साहिल पोपटानी या युवकाचा महात्मा फुले चौकातील सहकार सभागृहाजवळ अपघात झाल्याने त्याला उपचारासाठी नगर शहरातील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तेथे त्याच्यावर उपचार सुरू असताना रविवारी (7 जुलै) रात्री सव्वा आठ वाजता त्याचा मृत्यू झाला आहे. तशी माहिती रुणालयातील डॉक्टरांनी कोतवाली पोलिसांना दिली असून पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस अंमलदार सोनवणे तपास करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Udayanraje Bhosale : “मुख्यमंत्री अन् सरकार बोळ्याने…”; उदयनराजेंचा सरकारला घरचा आहेर,...

0
मुंबई | Mumbai गेल्या काही दिवसांपासून रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरुन (Waghya Statue) राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज ...