Friday, April 25, 2025
Homeनगरवाहनाची दुचाकीला धडक; सोनईच्या तरूणाचा मृत्यू

वाहनाची दुचाकीला धडक; सोनईच्या तरूणाचा मृत्यू

पांढरीपूल घाट उतरताना घडली घटना

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पांढरीपुल घाट उतरताना वळणावरून दुचाकी घसरून पडलेल्या तरूणाला अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. रावसाहेब सखाराम कातोरे (वय 38 रा. सोनई ता. नेवासा) असे मयत तरूणाचे नाव आहे. रविवारी (24 नोव्हेंबर) रात्री सव्वा आठच्या सुमारास खोसपुरी (ता. नगर) गावच्या शिवारात हॉटेल लिलियम पार्क समोर ही घटना घडली.

- Advertisement -

मयत रावसाहेब कातोरे यांचे भाऊ बाळासाहेब सखाराम कातोरे (वय 40 रा. धनगरवाडी, सोनई ता. नेवासा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवारी (25 नोव्हेंबर) सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री रावसाहेब कातोरे हे त्यांच्याकडील दुचाकीवरून (एमएच 20 बीए 205) अहिल्यानगर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून प्रवास करत असताना पांढरीपुल घाट उतारावरती हॉटेल लिलियम पार्क समोर दुचाकी वळनावर घसरली.

त्यानंतर काही क्षणात पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाची त्यांना धडक बसली. या धडकेत रावसाहेब यांच्या डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी होवून त्यांचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार दिवटे करत आहेत. दरम्यान, पांढरीपुल घाट उतरताना यापूर्वी अनेक अपघात होवून अनेकांचा जीव गेला आहे. वारंवार अपघात होत असून देखील त्या ठिकाणी उपययोजना केल्या जात नाही.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...