Monday, July 27, 2026
Homeनगरटाकळीमिया-देवळाली रस्त्यावरील अपघातात जखमी युवकाचा मृत्यू

टाकळीमिया-देवळाली रस्त्यावरील अपघातात जखमी युवकाचा मृत्यू

टाकळीमिया |वार्ताहर| Takalimiya

राहुरी तालुक्यातील टाकळीमिया-देवळालीप्रवरा रस्त्यावरील नागओढ्या जवळ दुचाकीवरुन पडून झालेल्या अपघातात जखमी झालेल्या युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मनोज गोरक्षनाथ करपे (वय 24) असे या तरुणाचे नाव आहे. टाकळीमिया देवळालीप्रवरा शिवेवर असलेल्या शिंदे वस्ती नजीक राहणारा मनोज करपे हा वीजपंपाचा स्टार्टर आणण्यासाठी सकाळच्या सुमारास टाकळीमिया गावात आला होता. परत जात असताना सकाळी आठ ते नऊ दरम्यान नाग ओढ्याच्या.थोडे पुढे थोड्या अंतरावर रानडुक्कर आडवे गेल्याने तो दुचाकी घसरून डांबरी रस्त्यावर पडला.

- Advertisement -

दरम्यान तो रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागला. त्यानंतर रस्त्याने जाण्यार्‍या चारचाकी गाडीच्या चालकाने प्रसंगावधान राखून मनोज याला टाकळीमिया येथे खाजगी दवाखान्यात आणले. मात्र डॉक्टरने त्यांना दुसर्‍या रूग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याला नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचाराला मनोज काहीच प्रतिसाद देत नसल्याने काल त्याची प्राणज्योत मालवली. मनोजवर टाकळीमिया येथील अमरधाम मध्ये शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मनोज करपे हा आई वडीलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे पश्चात आई -वडील, पत्नी, दोन बहिणी, मेहुणे असा परिवार आहे.

ताज्या बातम्या

Kopargaon : गोदामात युरियाची साठेबाजी; संस्थेच्या सचिवांसह दोघांवर गंभीर गुन्हा दाखल

0
रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Ranjangaon Deshmukh कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील मे मंजूर प्रगत शेतकरी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित येथे रासायनिक युरिया खताची बेकायदेशीर साठेबाजी, ई-पॉस...