Sunday, May 26, 2024
Homeनाशिकनिफाड तालुक्यातील जवानाचे अपघाती निधन

निफाड तालुक्यातील जवानाचे अपघाती निधन

खेडलेझुंगे / महादेव नगर | वार्ताहर

सिन्नर-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर पाथरे शिवारात रविवारी (दि. १६) दुपारी साडेतीनच्या सुमारास दोन दुचाकींची धडक होऊन झालेल्या अपघातात भारतीय सैन्यदल बाँबे इजिनिअर कोअर २३६ यडब्ल्युटी युनिट मध्ये आसाम (गुवाहाटी) येथे कार्यरत असलेले निफाड तालुक्यातील धानोरे गावचे भूमिपुत्र श्रीराम राजेंद्र गुजर (वय २५) हे मोटरसायकल अपघातात जबर दुखापत होवून जखमी झाले होते.

- Advertisement -

त्यांना साईबाबा संस्थानच्या संदर्भ सेवा रुग्णालयात उपचार घेण्याकरीता अपघात परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी भरती केले होते. डॉक्टरांनी जवानास वाचविण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. परंतु त्यांना यश मिळाले नाही. सोमवारी (दि. १७) उपचार सुरु असतांना श्रीराम राजेंद्र गुजर यांची प्राणज्योत मावळल्याची डॉक्टरांनी घोषित केले. जवान श्रीराम गुजर यांच्या निधनाने धानोरे गावावर शोककळा पसरली असून कुटुंबावर दुःखाचे सावट आहे. त्यांच्यावर मंगळवारी (दि. १८) अंत्यसंस्कार करण्यात आले.

विधानसभा अध्यक्षांच्या नोटीशीला ठाकरे गटाचा ठेंगा; उत्तर न देण्याची भूमिका

सुट्टी संपत असल्याने जवान श्रीराम गुजर रविवारी शिर्डी येथील साईबाबांचे दर्शन आणि त्या परिसरात राहणाऱ्या नातेवाईकांना भेटण्याच्या हेतूने श्रीराम राजेंद्र गुजर (रा. धानोरे, ता. निफाड) व अक्षय पाटीलबा जावळे (वय २५. रा. सोनगाव, ता. कोपरगाव) हे दोघे पल्सर मोटारसायकल (एमएच १५. एचए ९००६) वरून गेले होते. साईबाबांचे दर्शन घेवून परिसरातील नातेवाईकांना भेटून परतत असतांना पाथरे गावाकडून विरुद्ध बाजूला वळत असतांना समोरून येणाऱ्या मोटारसायकलने त्यांना जोराची धडक दिली.

अपघाताचा आवाज ऐकून पाथरेचे सामाजिक कार्यकर्ते यांनी बसस्थानक परिसरातील ग्रामस्थांनी तिघा युवकांना रस्त्यावरुन बाजूला घेतले. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या पिंपरवाडी येथील टोल नाक्यावरील मदत पथकाने अपघातग्रस्तांना साईबाबा संस्थानच्या संदर्भ सेवा रुग्णालयात हलविले. मात्र, तथे पोहचण्यापूर्वीच अक्षय जावळे याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या अपघातातील श्रीराम गुजर यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात तातडीने उपचार सुरू करण्यात आले होते.

Monsoon Session : मंत्री बिना तयारीने सभागृहात येतात, बाळासाहेब थोरात संतप्त

गावी सुट्टीवर आले होते…

श्रीराम गुजर हे २०१७ साली सैन्यात दाखल झाले. ते गुवाहाटी येथे सेवा बजावत होते. काही दिवसांची सुटी घेऊन ते गावी आले होते. ते मावस भाऊ अक्षय जावळे समवेत देवदर्शन आणि तेथून परिसरातील नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना शिर्डी महामार्गावर पाथरे गावाजवळ असलेल्या डोहाळे फाट्यावर प्लॅटीना गाडीची जोरदार धडक बसल्याने अक्षय जावळे हे जागीच ठार झाले. तर श्रीराम गुजर यांना जबर दुखापत झाली होती. त्यांच्यावर साईबाबा संस्थानच्या संदर्भ सेवा रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरु असतांना त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पाश्चात आई-वडील, भाऊ, बहीण, आजोबा असा परिवार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Bacchu Kadu : बच्चू कडू यांनी मंत्रिपदाचा दावा सोडला, कारण…

- Advertisment -

ताज्या बातम्या