Monday, October 14, 2024
Homeब्रेकिंग न्यूजनाशिकच्या विद्यार्थ्याचा कझाकिस्तानात अपघाती मृत्यू

नाशिकच्या विद्यार्थ्याचा कझाकिस्तानात अपघाती मृत्यू

नाशिक। प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

नाशिक येथील घरी गणेशाला विराजमान केल्यावर रशियाकडे गेलेल्या वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्याचा कझाकिस्तान येथे रस्ते अपघातात मृत्यू झाला.

अभिषेक युवराज जाधव (वय २२ रा. इंदिरा गांधी पुतळ्याजवळ, जेलरोड, नाशिक रोड) असे मृत मुलाचे नाव आहे. अभिषेक हा रशियात एमबीबीएसच्या विद्याशाखेत तिसऱ्या वर्षात शिकत होता. अभिषेक हा गणेशाेत्सवासाठी नाशिकला आई वडीलांकडे नाशिकला आला होता. काल पहाटे तो विमानाने रशियाला गेला.

तेथे पाेहाेचल्यावर अभिषेक व चार ते पाच मित्र कारने इच्छितस्थळी जात असतांना रस्त्याच्या बाजूला मोठ्या इमारतीचे बांधकाम सुरु होते. तेथील ट्रकला अडथळा आला वा तो ट्रक अचानक रस्त्यावर आला. त्यामुळे अभिषेकची कार त्या ट्रकवर जाऊन आदळली .अभिषेक कारमध्ये चालकाच्या बाजूकडील सीटवर बसला होता. त्यामुळे अभिषेक जागीच ठार झाला व अन्य मित्र जखमी झाले.

अभिषेकच्या मागे लहान बहिण आहे. त्याचे वडील नाशिक महानगरपालिकेत रुजू आहेत. अभिषेकच्या आईने मागील मनपाच्या पंचवार्षिक निवडणूक लढवली होती. अभिषेकचा मृतदेह गुरुवारी रात्री उशिरा नाशिकला आणणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या