Sunday, June 8, 2025
Homeदेश विदेशटवाळखोरांमुळे तरुणीचा अपघाती मृत्यू

टवाळखोरांमुळे तरुणीचा अपघाती मृत्यू

लखनौ | Lucknow –

- Advertisement -

टवाळखोरांपासून स्वत:ला वाचविण्याच्या प्रयत्नात एका विद्यार्थिनीचा मंगळवारी अपघातात मृत्यू झाला. ही घटना उत्तरप्रदेशातील बुलंदशहरात घडली. सुदीक्षा भाटी असे या तरुणीचे नाव असून, ती अमेरिकेतील बॅब्सन महाविद्यालयात शिकत होती. काही दिवसांपूर्वीच ती अमेरिकेतून भारतात परतली होती. सुदीक्षाला मागील वर्षी एचसीएलतर्फे 3.80 कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली होती. Sudiksha Bhati

सुदीक्षा तिच्या काकांसोबत स्कूटीवरून औरंगाबादला मामाकडे जात होती. त्यावेळी बुलेटवर असलेल्या दोघांनी तिचा पाठलाग केला. यादरम्यान बुलेटवर असलेल्या तरुणाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे सुदीक्षाची स्कूटी बुलेटवर जोरदार धडकली. या अपघातात ती स्कूटीवरून पडली. गंभीर जखमी झाल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पोलिसांनी अज्ञात दुचाकीचालकांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. सुदीक्षा 20 ऑगस्ट रोजी अमेरिकेला परत जाणार होती. पण, तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महाऊर्जा’च्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उदघाटन

0
पुणे । प्रतिनिधी Pune औंध मधील पर्यावरणपूरक, सुपर ई.सी.बी.सी आणि नेट झिरो संकल्पनेवर आधारित नवनिर्मित 'महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा)'च्या प्रशासकीय इमारतीचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र...