Thursday, May 23, 2024
Homeधुळेधुळ्यात विचित्र अपघात ; मुलगा ठार, आई-वडील गंभीर जखमी

धुळ्यात विचित्र अपघात ; मुलगा ठार, आई-वडील गंभीर जखमी

धुळे । प्रतिनिधी dhule

शहरातील देवपूर भागातील सातपुडा हायस्कूलसमोरील उड्डाण पुलावर विचित्र अपघात झाला. भरधाव कंटेनरचे अचानक चाक निखळले. ते दुभाजक ओलांडून दुचाकीला धडकले. त्यात दुचाकीवरील मुलगा ठार झाला तर आई-वडील गंभीर जखमी झाले. याप्रकरणी कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

शादबा एजाजमुसा बागवान असे मयत मुलाचे नाव आहे. तर एजाजमुसा बागवान (वय 53) व रिजावानबी ऐजाजमुसा बागवान (रा. घर नं 17, बंधेवास सोसायटी, मिलीत नगरजवळ, देवपूर) हे जखमी झाले. तिघे सोमवार दि. 10 जुलै रोजी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास दुचाकीने जात होते. त्यादरम्यान नगावबारी शिवारातील सातपुडा हायस्कूलसमोरील उड्डाण पुलावर दुसर्‍या बाजूने भरधाव जाणार्‍या एचआर 39 ई 7174 क्रमांकाच्या कंटेनरचे चाक अचानक निखळले. ते दुभाजक ओलांडून थेट बागवान यांच्या दुचाकीला धडकून अपघात झाला. त्यामुळे दुचाकीवरील तिघे खाली पडून जबर जखमी झाले. त्यांना तत्काळ नागरिकांनी रूग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतांना शादबा बागवान याचा मृत्यू झाला. तर दोघांवर उपचार सुरू आहेत. याबाबत जखमी एजाजमुसा बागवान यांनी पश्चिम देवपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एएसआय चिंचोलीकर हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या