Friday, July 24, 2026
HomeमनोरंजनEntertainment News: धावत्या लोकलमधून अभिनेत्रीने उडी मारली; हाता-पायाला दुखापत, रुग्णालयात दाखल

Entertainment News: धावत्या लोकलमधून अभिनेत्रीने उडी मारली; हाता-पायाला दुखापत, रुग्णालयात दाखल

मुंबई | Mumbai
अभिनेत्री करिश्मा हिचा भीषण अपघात झालाय. ट्रेनमधून तिने उडी मारल्याने तिच्या पाठीला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. मुंबईत लोकलमध्ये चढताना पाय घसरून पडणे, धावत्या ट्रेनमधून उतरताना दुखापत होणे अशा घटना घडत असतात. आता एका अभिनेत्रीने धावत्या ट्रेनमधून उडी मारली आहे. तिने स्वतः पोस्ट’ करून याबद्दल सोशल मीडियावर माहिती दिली. करिश्मा शर्मा असे या अभिनेत्रीचे नाव आहे.

करिश्मा शमनि धावत्या लोकलमधून उडी घेतली. तिला चर्चगेटला शूटसाठी जायचे होते, त्यासाठी ती साडी नेसून लोकलमध्ये चढली होती. स्टेशनवरून लोकल सुटली, तिने वेग पकडला आणि नंतर करिश्मा शमनि लोकलमधून उडी मारली. यामुळे तिला जबर दुखापत झाली आहे. करिश्मा शर्माने पोस्टमध्ये लिहिले, “काल मी चर्चगेटला शूटसाठी जात होते, मी साडी नेसून लोकलने जायचे ठरवले. मी ट्रेनमध्ये चढले, ट्रेन सुटली आणि वेग पकडला. मग मला लक्षात आले की माझे मित्र ट्रेन पकडू शकले नाहीत. त्यामुळे मी घाबरून ट्रेनमधून उडी मारली. दुर्दैवाने पाठीवर पडले आणि डोक्याला जबर मार बसला. माझ्या पाठीला दुखापत झाली आहे, डोकं सुजले आहे आणि शरीरावर काही ठिकाणी खरचटले आहे. डॉक्टरांनी एमआरआय केले आणि डोक्याला झालेली दुखापत गंभीर आहे की नाही हे पाहण्यासाठी मला एक दिवस निरीक्षणाखाली ठेवले आहे. कालपासून मला खूप त्रास होतोय, पण मी हिंमत ठेवतेय. माझ्यासाठी प्रार्थना करा. असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे.

- Advertisement -

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

संपादकीय : २४ जुलै २०२६ – युवकांचा आक्रोश अन् राजकारणाचा बनाव

0
वैद्यकीय प्रवेशाच्या नीट परीक्षा पेपरफुटीचे पडसाद निकाल किंवा न्यायालयाच्या कक्षांपुरते मर्यादित न राहता, थेट देशातील रस्त्यारस्त्यांवर उमटले आहेत. लाखो तरुणांचे भविष्य अंधारात ढकलले गेल्याच्या...