Saturday, October 12, 2024
Homeजळगावभुसावळ : गोळीबार प्रकरणात गावठी कट्टा पुरविणार्‍या आरोपीला अटक

भुसावळ : गोळीबार प्रकरणात गावठी कट्टा पुरविणार्‍या आरोपीला अटक

भुसावळ – Bhusawal :

येथील आरपीडी रोडवरील मुस्लीम कब्रस्थानाजवळ किरकोळ कारणावरून 19 वर्षीय तरुणावर गोळी झाडून फायटरने मारहाण झाल्याची घटना दि.9 रोजी रात्री नऊ चाळीस वाजेच्या सुमारास घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गु.र.नं.377/2020 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींना दि.11 रोजी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांचा पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

या गुन्ह्यातील गावठी कट्टा पुरविणार्‍या आरोपी नांदुरा असल्याची गुप्त माहिती अप्पर पोलीस अधीक्षक यांना मिळल्यावरून स्थानिक गुन्हे शाखा पथक व बाजारपेठचे कर्मचारी गुन्ह्यातील फरार आरोपीच्या शोधकामी नांदुरा येथे जाऊन आरोपीस ताब्यात घेऊन रात्री उशिरा नवव्या आरोपीस शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.

सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी आदित्य संजय लोखंडे (वय 19, रा. न्यू आंबेडकर नगर,भुसावळ) याने दिलेल्या फिर्यादीनुसार भूषण सपकाळे याने फोन करून बोलावून कब्रस्थान जवळ घेऊन गेला. त्या ठिकाणी अतिष खरात पूर्ण नाव माहीत नाही, हंसराज पूर्ण नाव माहीत नाही, गोलू उर्फे राजन खरात पूर्ण नाव माहीत नाही, चिन्न पूर्ण नाव माहीत नाही, सूरज पूर्ण नाव माहीत नाही, गोविंदा पूर्ण नाव माहीत नाही, कपिल कासे पूर्ण नाव माहीत नाही, राहुल धम्मा सुरवाडे यांनी मिळून फायटरने तसेच चापट्या बुक्यांनी मारहाण केली.

तसेच गावठी कट्ट्याने गोळीबार करून गोळी तरुणाच्या कानाला, डोक्याला लागली असून तरुणाच्या हातालाही दुखापत झाली आहे. यातील गुन्ह्यात पुरविण्यात आलेल्या गावठी कट्ट्या बाबतचा फरार (नववा) आरोपी नावे सचिन भीमराव वाघ (वय 28, राहणार भुसावळ ह.मु.नांदुरा जि.बुलढाणा) मध्ये असल्याची गुप्त माहिती अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांना मिळल्यावरून स्थानिक गुन्हे शाखाचे पोकॉ रविंद्र पाटील, कमलाकर बागुल, दादाभाऊ पाटील, दिपक चौधरी वाहन चालक तसेच बाजारपाठचे दबंग पोकॉ विकास सातदिवे यांनी नांदुरा जाऊन आरोपीस ताब्यात घेऊन शहर पोलीस स्टेशनला आणले. तसेच शहर पोलीस स्टेशनचे पोनि बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीस तपास अधिकारी सपोनि विनोद कुमार गोसावी यांच्या ताब्यात दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या