Saturday, May 4, 2024
Homeजळगावजीवघेण्या प्रकरणातील आरोपीला 3 वर्ष कारावासाची शिक्षा

जीवघेण्या प्रकरणातील आरोपीला 3 वर्ष कारावासाची शिक्षा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

रिक्षाचा धक्का दुचाकीला लागल्याच्या कारणावरून रिक्षा चालकाने (rickshaw driver) दुचाकीस्वाराच्या (biker) डोक्यात बेसबॉल खेळण्याचे दांडा मारून गंभीर दुखापत (serious injury) केल्याची घटना चाळीसगाव शहरात घडली होती. या गुन्ह्यातील आरोपीला जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्यायमुर्ती जे.जे. मोहिते यांनी 3 वर्षाचा सश्रम कारावास आणि 10 हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे.

- Advertisement -

चाळीसगाव येथील रहिवाशी ईश्वर लक्ष्मण लोखंडे हे 1 ऑक्टोबर 2016 रोजी त्यांच्या दुचाकीने जात असतांना ऑटोरिक्षाचा धक्का लागला. रिक्षाचालक उमेश रामा ठोंबरे (रा. चाळीसगाव) यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात रिक्षा चालकाने बेसबॉल खेळण्याचा स्लगर (दांडा) ईश्वर लोखंडे यांच्या डोक्यात मारून गंभीर दुखापत केली होती. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर मारहाण करणार्‍या उमेश ठोंबरेला 2 डिसेंबर 2016 रोजी अटक केली होती. या गुन्ह्याचा तपास विजय कुमार बोत्रे करीत होते. त्यानुसार त्यांनी जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्यायमुर्ती जे.जे. मोहिते यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. या खटल्यात एकुण 10 साक्षिदार तपासण्यात आले. यात ईश्वर लोखंडे आणि साक्षिदार यांची साक्ष महत्वाची ठरली. त्यानुसार न्यायमुर्ती जे.जे.माहिते यांनी उमेश रामा ठोंबरे याला दोषी ठरवत 3 वर्ष सश्रम कारवास आणि 10 हजाराचा दंडाची शिक्षा शुक्रवारी 24 मार्च रोजी सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील वैशाली महाजन यांनी युक्तीवाद केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या