Tuesday, March 25, 2025
Homeनगरग्रामपंचायत निधीचा संशयित अपहार केल्याचा ठपका

ग्रामपंचायत निधीचा संशयित अपहार केल्याचा ठपका

बेलापूर बुद्रुकचे तत्कालीन व विद्यमान ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील बेलापूर बुद्रुकचे तत्कालीन ग्रामसेवक राजेश तगरे व विद्यमान ग्रामसेवक मेघश्याम गायकवाड यांना निलंबीत करण्यात आले आहे. जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश काढल्याने तालुक्यातील ग्रामसेवकांमध्ये खळबळ उडाली आहे. बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक राजेश एकनाथ तगरे हे बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतमध्ये कार्यरत असताना ग्रामंपचायत कार्यालयीन कामकाजात हलगर्जीपणा व कर्तव्यात कसूर केला. तसेच ग्रामपंचायतीस प्राप्त निधीचा कायमस्वरुपी व संशयित अपहार केल्याचे तसेच तगरे हे कामावर असताना कार्यालयीन कामामध्ये त्यांनी गैरवर्तन केले असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

- Advertisement -

तर मेघश्याम गायकवाड यांच्यावरही कार्यालयीन कामकाजात हलगर्जीपणा व कर्तव्यात कसूर केला. तसेच ग्रामपंचायतीस प्राप्त निधीचा कायमस्वरुपी व संशयित अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांच्या केलेल्या चौकशीमध्ये वरील बाब निदर्शनास आलेली आहे. त्यामुळे श्री. तगरे व गायकवाड यांनी महाराष्ट्र जि.प. सेवा (वर्तणूक) नियम 1967 च्या नियम 3 चा भंग केलेला आहे. त्यांच्याविरुध्द शिस्तविषयक कार्यवाही अनिर्णित असल्याने त्यांना सदरचा आदेश बजावल्याच्या दिनांकापासून जिल्हा परिषद सेवेतून ग्रामसेवक या पदावरुन निलंबित करण्यात आले आहे. तसेच आदेश अंमलात राहील तेवढ्या कालावधीत राजेश तगरे यांचे मुख्यालय पंचायत समिती अकोले, तर मेघश्याम गायकवाड यांचे मुख्यालय पंचायत समिती, जामखेड राहणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी काढलेल्या आदेशात म्हंटले आहे.

जिरवाजीरवीचे बळी
बेलापूर ग्रामपंचायतीच्या राजकीय जिरवाजीरवीमध्ये या दोन ग्रामसेवकांचा बळी गेल्याची चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे. बेलापूर ग्रामपंचायतीमध्ये विकास कामांवरून असो, सरपंचपद बदलावरून तसेच इतरही कारणावरून अनेक नाट्यमय घडामोडी घडलेल्या आहेत. प्रत्येकवेळी ग्रामपंचायतीचा वाद जि.प.च्या कोर्टापर्यंत गेलेला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : लोणकर मळा येथे CCTV फुटेजमध्ये दोन बिबट्यांचे दर्शन

0
नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road येथील जयभवानी रोड, लोणकर मळा, नाशिकरोड येथे मध्यरात्री १ वाजता बिबट्याचे (Leopard) दर्शन झाले व त्याआधी २० मार्च रोजी...