Sunday, April 13, 2025
Homeब्रेकिंग न्यूजSuicide News : कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीची कारागृहात आत्महत्या

Suicide News : कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीची कारागृहात आत्महत्या

मुंबई | Mumbai

कल्याणमध्ये (Kalyan) अवघ्या १३ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार (Rape) करुन तिची निर्घृणपणे हत्या (Murder) केल्याप्रकरणी तुरूंगात (Jail) असलेला नराधम विशाल गवळी (Vishal Gavali) या आरोपीने आज पहाटेच्या सुमारास आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे तळोजा कारागृहात एकच खळबळ उडाली असून, याप्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी केली जात असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात विशाल गवळी याने कल्याणच्या कोळसेवाडी परिसरातील अल्पवयीन मुलीला (Girl) फूस लावून स्वत:च्या घरी आणले होते. यानंतर घरात त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार कोणाला कळू नये म्हणून विशालने घरातच या मुलीची हत्या केली होती. त्यानंतर विशाल गवळीने या मुलीचा मृतदेह (Dead Body) बापगाव परिसरात फेकून दिला होता. यानंतर विशाल गवळी हा शेगावला पळून गेला होता.

दरम्यान, त्यानंतर शेगाव पोलिसांनी (Shegaon Police) सापळा रचत शिवाजी चौकातील एका सलूनमधून त्याला ताब्यात घेतले होते. या घटनेनंतर कल्याण परिसरात संतप्त पडसाद उमटले होते. यानंतर आज पहाटेच्या सुमारास विशाल गवळी याने तुरुंगातील कोठडीत असलेल्या शौचालयात जाऊन गळफास लावून आत्महत्या (Suicide) केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या घटनेची तुरुंग प्रशासनाला माहिती मिळताच त्यांनी तात्काळ विशाल गवळी याचा मृतदेह खाली उतरवला. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे.रुग्णालयात (J.J Hospital) पाठविण्यात आला. 

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : शाळा व्यवस्थापन समिती ठरवणार गणवेशाचा रंग

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात महापालिका, जिल्हा परिषद यांसह अन्य पात्र शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी दोन गणवेशांचे वाटप केले जाणार आहेत....