Saturday, June 15, 2024
Homeनगरकबुतर चोरीचा आरोप; संगमनेरात तरुणास मारहाण

कबुतर चोरीचा आरोप; संगमनेरात तरुणास मारहाण

पाच जणांवर गुन्हा

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

- Advertisement -

कबुतर (Pigeon) चोरल्याचा आरोप करुन एका तरुणास शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) करुन जीवे मारण्याची धमकी (Threat) दिल्याची घटना खराडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पाठीमागे बुधवार दि. 1 मे रोजी रात्री साडेबारा वाजता घडली आहे. याप्रकरणी संगमनेर (Sangamner) शहर पोलिसांत पाच जणांवर गुन्हा दाखल (Filed a Case) झाला आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून (Police) मिळालेली अधिक माहिती अशी, की तालुक्यातील खराडी येथील शाळेच्या पाठीमागे बिपीन उमेश मेणे या तरुणावर कबुतर चोरल्याचा आरोप करुन मनोज रावसाहेब चव्हाण (रा. श्रीरामपूर), रोहित भाऊसाहेब शिंदे, अमोल संजय शिंदे, राहुल संजय शिंदे व यश राजेंद्र शिंदे (सर्व रा. वाघापूर) यांनी शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जखमी (Injured) केले. त्यानंतर मेने याचे कपडे फाडले.

या झटापटीत मेने याच्या खिशातील पाच हजार नऊशे रुपये गहाळ झाले. तसेच आमच्या विरुद्ध पोलिसांत तक्रार दिली तर तुला जीवे मारुन टाकू, अशी धमकी दिली. याप्रकरणी बिपीन मेने याने दिलेल्या तक्रारीवरुन वरील पाच जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल (Filed a Case) झाला आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक सुजाता थोरात या करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या