Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमपोलिसांच्या ताब्यातून सराईत आरोपी पसार

पोलिसांच्या ताब्यातून सराईत आरोपी पसार

महिला वकिलाच्या घरात घुसून लुटला होता ऐवज

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

किरण कोळपे (रा. विळद ता. नगर) याला कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी (दि.9) पकडले. त्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले असता तेथून पसार झाला आहे. दरम्यान, कोळपे पळून गेल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कोतवालीचे सहायक फौजदार सुनील जगन्नाथ भिंगारदिवे यांनी फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

कोळपे याने गुन्ह्याचे वकिलपत्र असलेल्या महिला वकिलाच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली होती. घरातील सोन्यांचे दागिने, रोख रक्कम व मोक्का कोर्ट केस कामकाजाचे मुळ कागदपत्र असा 1 लाख 92 हजार 700 रूपयांचा ऐवजही बळजबरीने नेल्याची घटना काटवन खंडोबा परिसरात घडली होती. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपीला पकडण्यात आले होते. त्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले असता, तेथून तो पसार झाला आहे. तो पत्रकार चौकाकडे पळत असताना कोतवाली पोलिसांनी त्याचा पाठलाग केला.

पत्रकार कॉलनीत विचारपूस केली असता, टी शर्ट घातलेला एक इसम पुढील दिशेने पळून गेल्याचे दोन महिलांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याचा शोध घेतला परंतु तो मिळून आला नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. कोळपे विरोधात 2022 मध्ये एमआयडीसी पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्याचे वकिलपत्र अ‍ॅड. नाजमीन बागवान (वय 32) यांच्याकडे होते. कोळपे विरोधात 2023 मध्ये राहुरी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात त्याला मोक्का लावण्यात आला होता. या गुन्ह्याचे कामकाजही अ‍ॅड. बागवान पाहत होत्या.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...