Tuesday, March 25, 2025
Homeनगरपोलीसांच्या हातावर तुरी देत आरोपीने ठोकली धुम

पोलीसांच्या हातावर तुरी देत आरोपीने ठोकली धुम

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

चोरीच्या गुन्ह्यात अटक (Arrested) केलेला आरोपी पोलीसांच्या हाताला झटका मारून पळुन गेल्याची घटना श्रीगोंदा (Shrigonda) शहरात घडली आहे.

- Advertisement -

सविस्तर माहिती अशी की, श्रीगोंदा शहरातील एका दुकानात समाधान हरिभाऊ मगर (रा. अंभोरा ता. मंठा जि. जालना) हा कामाला असतांना त्यांने त्याच दुकानात चोरी (Theft) केली होती. याप्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता. बुधवारी सायंकाळी सदर आरोपीला शहरातील ग्रामीण रूग्णालयात तपासणीसाठी नेत असतांना त्याने पोलीसांच्या हातावर तुरी देवून बेडीसह पसार झाला आहे.

सदर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीसांनी तीन पथके आरोपीच्या शोधासाठी पाठवले असुन याबाबतची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात (Shrigonda Police Station) भेट देवून पोलीसांना आरोपीच्या शोधासंदर्भात सुचना केल्या आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...