Tuesday, June 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजवृद्ध महिलेच्या खून प्रकरणी आरोपीस आजन्म कारावास

वृद्ध महिलेच्या खून प्रकरणी आरोपीस आजन्म कारावास

देवडोंगरी | वार्ताहर Devdongri

- Advertisement -

त्र्यंबकेश्वर तालुयातील रायते पैकी बेलीचापाडा येथे जानेवारी २०२३ रोजी भुताळपणाच्या कारणावरुन कुर्‍हाडीने वार करून एका वयोवृद्ध महिलेचा खून करणार्‍या आरोपीस नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म कारावास व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हरसूल पोलीस स्टेशन गुरनं. १७/२०२३ भादंवि कलम ३०२ प्रमाणे नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश के. के. पाटील यांचे न्यायालयात दाखल खटल्याची सुनावणी झाली. गुन्ह्यातील आरोपी योगेश किसन वड (२७) रा. रायते पैकी बेलीचापाडा ता. त्र्यंबकेश्वर याचे विरुध्द खुनाचा आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपीस भादंवि कलम ३०२ मध्ये दोषी ठरवून सी.आर.पी.सी. २३५(२) प्रमाणे आजन्म कारावास व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.

सदरची घटना जानेवारी २०२३ मध्ये रायते पैकी बेलीचापाडा येथे घडली होती. दि. ३० जानेवारी २०२३ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास आरोपी योगेश किसन वड याने रायते पैकी बेलीपाडा येथील वयोवृद्ध महिला (६०) ही भुताळी आहे व तिने भुताळपण लावले आहे. या कारणावरुन तिच्या हातातील कुर्‍हाडीने वार करुन जबर मारहाण करुन वयोवृद्ध महिलेस गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले होते.

गुन्ह्यातील आरोपी योगेश किसन वड यास दि.३१ जानेवारी २०२३ रोजी अटक करण्यात आली होती. सदर गुन्ह्यात आरोपीविरुध्द पुरावा गोळा करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. खूनाच्या प्रकरणामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदीत्य मिरखेलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी सपोनि एन.ई. बोडखे यांनी तांत्रिक व कौशल्यपूर्ण तपास करुन आरोपी विरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर गुन्हा स्टार केस म्हणून निवड करुन हरसूल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांनी सदर गुन्ह्यात पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parisahd Election : शहराध्यक्षांच्या ड्रायव्हिंगचा उत्साह पडला महागात; भाजप...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik विधान परिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election) पार्श्वभूमीवर भाजपच्या नगरसेवकांना (BJP Corporators) सहलीसाठी रवाना करण्यात येत असताना नगरसेवकांना घेऊन जाणारी लक्झरी...