Friday, December 13, 2024
Homeधुळेमोटर सायकल व मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीस अटक

मोटर सायकल व मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीस अटक

दोंडाईचा dondichya (श. प्र.) –

येथील पोलिसांनी मोटरसायकल व मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीस अटक केलीअसून त्याकडून दोन मोटरसायकल व आठ  मोबाईल असा एकूण १ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

- Advertisement -

वालखेडा येथील रहिवासी भूपेंद्र कैलास महाजन यांनी त्यांची मोटरसायकल (क्र.एम एच १८ बीटी ८६३५) दि.15 रोजी दोंडाईचा येथील रानफुल कॉलनीतील विठ्ठल मंदिराजवळ घरासमोर लावली होती. ती अज्ञात चोरट्याने चोरली होती याप्रकरणी दोंडाईचा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता. तसेच दि. १७ रोजी दोंडाईचा शहरात नंदुरबार चौफुली येथे पोलीस उपनिरीक्षक दिनेश मोरे, पोलीस कॉन्स्टेबल अनिल धनगर, चालक नरेंद्र शिरसाठ असे नाकाबंदी करीत असताना एक मोटरसायकलवर दोन इसम दिसले त्यांना थांबवले त्यांच्याकडे मोटरसायकल क्रमांक एम एच १८ बी डब्ल्यू १७०५ अशी मिळून आली., त्यांना इतक्या रात्री कुठे जात आहे, याबाबत विचारणे केली. तेव्हा त्यांने उडवाउडवीचे उत्तर दिले. एकाचे नाव राजेंद्र नाना ठाकरे असे असून त्याच्या सोबत एक बालक होता.

गाडीचे कागदपत्र बाबत विचारणा केले असता घरी असल्याचे सांगितले. त्याच्यावर संशय आल्याने त्यांना पोलीस ठाणे येथे आणून त्यांची विचारपूस केली असता त्यांनी ती मोटरसायकल चोरी करून आणले बाबत सांगितले. तसेच त्यांचे अंग झडती घेतली असता त्यांच्याकडे पाच वेगवेगळ्या कंपनीचे  2  मोबाईल मिळून आले. पोलीस कस्टडी दरम्यान आरोपीने तीन मोबाईल फोन व एम एम एच १८ बीटी ८६३५ गुन्हा दाखल असलेले मोटरसायकल काढून दिली. तसेच आरोपीकडून एम एच १८ ब्युटी ८६३५ व एम एच १८ बी डब्ल्यू १७०५ मोटरसायकल व आठ वेगवेगळ्या कंपनीच्या मोबाईल असे एकूण  १ लाख ७६ हजरांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. विधी संघर्ष बालकाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. 

ही  कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाने व पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या सूचनेप्रमाणे उपनिरीक्षक दिनेश मोरे, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण निंबाळे, पुरुषोत्तम पवार, अनिल धनगर, लखन कापुरे, हर्षद बागुल, चालक नरेंद्र शिरसाठ यांनी केली.गुन्ह्याचा पुढील तपास पो.कॉ प्रवीण निंबाळ हे करीत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या