Saturday, June 15, 2024
Homeनाशिकआठ महिन्यांत 12 हजार टवाळखोरांवर कारवाई

आठ महिन्यांत 12 हजार टवाळखोरांवर कारवाई

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

शहर पोलीस आयुक्त म्ंहणून अंकुश शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यापासून विविध पथके तयार करुन गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले आहे. त्याच प्रमाणे मोक्का सारख्या कायद्याचे व तडीपारी, स्थानबध्द कारवाई करुन गुन्हेगारांच्या मुसक्या आळण्यात पोलिसांना यश मिळाल्याची माहिती पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण व सहा. पोलीस आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

2022 साली 1 मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती, तर चालू वर्षात आतापर्यंत तब्बल 4 गुन्हेगारांवर ही कारवाई करण्यात आली आहे. तर गत वर्षात फक्त 2 गुन्हेगारांना स्थानबध्द केले होते, तर चालू वर्षात सुमारे आठ महिन्यात तब्बल 9 गुन्हेगार स्थानबध्द करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे मागील वर्षी एकूण 10 हजार 841 टवाळखोरांवर कारवाई झाली होती, मात्र गत आठ महिन्यात तब्बल 12 हजार 774 टवाळखोरांवर शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.

2023 मध्ये नाशिक शहर पोलीस दलाकडुन विविध उपक्रम व योजना कार्यान्वीत करून अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करून शहरातील गुन्हेगारी रोखण्याकरीता मोक्का, एम. पी.डी.ए., तडीपारी सोबतच टवाळखोरांवर कारवाई करण्याची कारवाई करुन नागरिकांच्या सुरक्षेस प्राधान्य देण्यात आले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

नाशिक शहरात यापुर्वी मागील पाच वर्षात घडलेले खुनासारखे गंभीर गुन्हे तसेच वाहनांची जाळपोळ, तोडफोडीच्या घटना, पार्श्वभूमी व असे गुन्हे करणारे गुन्हेगारांच्या मानसिकतेचा अभ्यास करून अशा प्रकारची गुन्हेगारी प्रवृत्ती असणारे गुन्हेगार मोकळे राहणार नाहीत, याची खबरदारी घेण्यात आली, असे दोन्ही अधिकार्‍यांनी सांगितले.

हे उपक्रम सुरू

नागरिकांमध्ये विश्वास निर्माण होऊन थेट पोलिसांशी संवाद व्हावा, यासाठी चौक सभेचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. नियंत्रण कक्ष येथे नागरीकांना माहिती देण्यासाठी Whatsapp नंबर कार्यान्वित करण्यात आले असून पोलीस स्टेशन व विविध शाखांच्या कामावर देखरेख ठेवून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी साप्ताहिक आढावा बैठक घेण्यात येत आहे. तर सायबर गुन्हे रोखण्यासाठी एक हजार पेक्षा जास्त सायबरदुतांची टीम तयार करण्यात आली आहे.

शहरात विविध सण-उत्सव शांततेत व्हावे, यासाठी शांतता समितीमध्ये नवतरुणांचा व राजकीय, सामाजिक, ऐतीहासीक व मानसशास्त्रीय ज्ञान असणार्‍या तरुण शिक्षक, प्राध्यापकांचा सहभाग करून घेण्यात येत आहे. तसेच वाहतुक नियंत्रणासाठी सी.सी.टी.व्ही.च्या माध्यमातुन नियंत्रण करणे आदी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या सर्वांचा चांगला परिणाम दिसून येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या