Monday, May 27, 2024
Homeनाशिकगुटखा विक्रेत्यावर कारवाई

गुटखा विक्रेत्यावर कारवाई

सप्तशृंगीगड । वार्ताहर

नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार सप्तशृंगीगड येथे आज विशेष पथकाने अनेक दुकानाची तपासणी केली. येथील आई साई जनरल स्टोअर्सच्या चालक महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित पानमसाला व तंबाखू असा गुटखा सदृश माल स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी विक्री करत असल्याचे विशेष पथकाला मिळवून आले.

- Advertisement -

सदर इसमाकडे ३८५१ रुपयाचा प्रतिबंधित गुटखा मिळवून आल्याने सदरचा प्रतिबंधित गुटखा विक्रीचा धंदा आर्थिक फायदयासाठी करत असल्याची कबुली या इसमाने पोलीस अधीक्षक यांचा नेमणूक केलेल्या विशेष पथकाला दिली. या इसमावर कळवण पोलीस ठाणे येथे भांदवी कलम ३२८, १८८, २७२, २७३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई विशेष पथक पोलीस उपनिरीक्षक राजू ब्रिजलाल पाटील पोलीस नाईक उगलाल प्रधान चौरे, पो.शिपाई कैलास बाळू पवार, पोलीस शिपाई हिरामण लक्ष्मण चौधरी , गोकुळ दिलीप खैरनार, अनिल नागो दुसे महिला पोलीस शिपाई .उर्मिला कोंडीबा पारवे, यांनी केली असून पुढील तपास कळवण पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण पोलीस अंतर्गत नांदुरी दुरक्षेत्रातील पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या