नाशिक। प्रतिनिधी Nashik
आज पर्यटकांच्या गर्दीने पहिने, वाडीवऱ्हे, त्र्यंबकेश्वर फुलून गेले हाेते. याच गर्दीत काही हुल्लडबाज, मद्यपि चालकांनी विकेंडमध्ये सहभाग घेत नियमांचा भंग केला. मात्र, वाडीवऱ्हे पाेलिसांनी तैनात केलेल्या नाकाबंदीतून नियमभंग करणाऱ्यांची सुटका झालीच नाही तर यातील काहींवर गुन्हे नाेंदविण्यात आले.
ग्रामीण पाेलिसांनी महत्त्वाच्या व गर्दीच्या ठिकाणी नाकाबंदी करुन मद्यपी चालक, ट्रिपल सीट चालक हेरुन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली..यात विनाहेल्मेट, ट्रिपलसीट, विना सिट बेल्ट चालकांवर मोटर वाहन कायद्यानुसार ७२ केसेस करुन ७२ हजारांचा दंड आकारण्यात आला. तर, एकूणच तपासणीत चार मद्यपि आढळले. त्यांच्यावर ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई करण्यात आली.
विविध पाॅईंटवरील बंदाेबस्तासाठी वाडीवऱ्हे पाेलीस ठाण्याच्या पाेलीस निरीक्षक सारिका आहिरराव यांच्यासह अन्य दाेन अधिकारी, १० अंमलदार, ग्रामीण पाेलीस मुख्यालयातील १ अधिकारी, ७ अंमलदार, वाहतूक शाखेचे ४ अंमलदार असा बंदोबस्त तैनात हाेता.