Thursday, September 12, 2024
Homeनाशिककार्यालयात उशिरा येणाऱ्या जिल्हा परिषद सेवकांवर कारवाई

कार्यालयात उशिरा येणाऱ्या जिल्हा परिषद सेवकांवर कारवाई

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचार्‍यांसाठी येण्याची वेळ व कार्यालय सोडण्याची वेळ ही निश्चित आहे, तरीसुद्धा जिल्हा परिषदेत कर्मचारी उशिरा येत असतात. याबद्दल नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वेळोवेळी कर्मचारी उपस्थिती आढावा घेण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाला दिल्या होत्या.

- Advertisement -

सामान्य प्रशासन विभागाचा नव्याने पदभार स्वीकारलेले उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी या अनुषंगाने कठोर पावले उचलत काल सकाळी 10.20 मिनिटांनी जिल्हा परिषदेतील सर्व 20 विभागांचे हजेरी पुस्तक मागवले. जिल्हा परिषद मुख्यालयात 435 कर्मचारी कार्यरत असून यापैकी तब्बल 95 कर्मचारी हे कार्यालयीन वेळेत गैहजर असल्याचे आढळून आले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

जिल्हा परिषदेची कार्यालयीन वेळ ही सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 आहे. परंतु काही कर्मचारी सतत उशिराने येत असल्याबाबतच्या तक्रारी या जिल्हा प्रशासनाकडे येत होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागास तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. काल नेहमीप्रमाणे सकाळी 9.45 वाजता सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी काही विभागांना भेटी देत पाहणी केली असता अनेक कर्मचारी कार्यालयीन वेळ सुरु झाली असून सुद्धा कार्यालयात उपस्थित नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी सकाळी 10.20 मिनिटांनी जिल्हा परिषदेतील सर्व विभागातील कर्मचारी हजेरी पत्रक मागवून घेत सामान्य प्रशासन विभागास तपासणी करण्याचे निर्देश दिले. या तपासणीत 20 विभागातील तब्बल 95 कर्मचारी हे कार्यालयीन वेळेत उपस्थित नसल्याचे आढळून आले. ही सर्व हजेरी पत्रके परदेशी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली.

कार्यालयीन वेळेत अनुपस्थित असणार्‍या या सर्व 95 कर्मचार्‍यांना संबंधित विभागप्रमुखांकडून कारणे दाखवा नोटीस देण्यात येणार असून सर्व करणे दाखवा नोटिसांचा खुलासा हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना करावा, अशा सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद मुख्यालयासह पंचायत समिती स्तरावर देखील वेळोवेळी अशी तपासणी करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद मुख्यालयातील सर्व कर्मचार्‍यांनी कार्यालयीन वेळेत 9.45 वाजता येणे अपेक्षित असतांना बहुतांश कर्मचारी हे उशिराने येतात, अशा कर्मचार्‍यांवर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निर्देशानुसार प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे.

– रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, जि.प.नाशिक

विभागनिहाय अनुपस्थिती

अर्थ विभाग – 5

कृषी विभाग – 7

पशुसंवर्धन विभाग – 3

समाजकल्याण विभाग – 8

महिला व बालकल्याण विभाग – 1

शिक्षण विभाग प्राथमिक – 12

शिक्षण विभाग माध्यमिक – 4

आरोग्य विभाग – 11

बांधकाम विभाग 1 – 13

बांधकाम विभाग 2 – 7

बांधकाम विभाग 3 – 6

लघु पाटबंधारे विभाग – 1

ग्रामीण पाणीपुरवठा विभाग – 4

समग्र शिक्षा अभियान विभाग – 3

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग – 5

मनरेगा विभाग – 2

राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान विभाग – 3

- Advertisment -

ताज्या बातम्या