Saturday, September 21, 2024
Homeमुख्य बातम्याकृषी विभागाची कारवाई; 'इतक्या' कृषी निविष्टा चालकांचे परवाने निलंबीत

कृषी विभागाची कारवाई; ‘इतक्या’ कृषी निविष्टा चालकांचे परवाने निलंबीत

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करत शेतकऱ्यांना (farmers) खते अधिक दराने विकणाऱ्या जिल्ह्यातील नऊ कृषी निविष्टा चालकांना कृषी विभागाने (Department of Agriculture) कारवाई करत मोठा दणका दिला आहे. कृषी विभागाने केलेल्या तपासणीतून हा प्रकार पुढे आला असून या कृषी निविष्टांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

जिल्हा सध्या रब्बी हंगाम (rabbi season) जमा सुरू असून उन्हाळी हंगामातील पिकांची ही लागवड सुरू आहे.अशा हंगामामध्ये शेतकऱ्यांकडून रासायनिक खते, सेंद्रिय खतांना मागणी अधिक वाढते. कांदा, ऊस, द्राक्ष, डाळिंबासह भाजीपाल्यासारख्या पिकांसाठी तर मोठ्या प्रमाणावर खतांचा वापर केला जातो. मात्र, खतांच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या असल्याने जवळपास ७० ते ७५ टक्के आर्थिक खर्च शेतमाल उत्पादनातून शेतकऱ्यांना खतांच्या किंमतीवर खर्च करावा लागत आहे.

जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून फसवणूक होत असल्याबाबत कळवण (kalwan), चांदवड (chandwad), देवळा (devla) तालुक्यातील शेतकऱ्यांकडून तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या होत्या.यामध्ये कृषी निविष्ठा केंद्रचालक शेतकऱ्यांकडून अधिक दर वसूल करीत असल्याच्या तक्रारी होत होत्या. या कृषी निविष्ठा केंद्रचालकांवर कारवाई करत जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे यांनी संबधित दुकानदारांचे परवाने एक महिन्याच्या कालावधीसाठी निलंबीत केले आहेत. कृषी विकास अधिकारी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांच्या पथकांनी ही कारवाई केली आहे.

ही कारवाई करण्यासाठी काही खत विक्रेत्यांकडे बनावट ग्राहक पाठविण्यात आले होते.तेव्हा अधिक दराने खतांची विक्री होत असल्याचे समोर आले. त्यामुळे या नऊ खत विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांचे परवाने १६ फेब्रुवारीपर्यंत निलंबित केले आहेत. खत विक्रेत्यांनी केंद्राच्या दर्शनी भागात खत साठ्याची आणि दराची माहिती लावणे अनिवार्य आहे.

– विवेक सोनवणे, जिल्हा अधीक्षक कृषी विभाग

- Advertisment -

ताज्या बातम्या