धुळे – प्रतिनिधी dhule
निजामपूर (Nizampur) आणि जैताणे गावात वीजचोरी (Electricity theft) आणि आकडे पकडण्याची धडक मोहीम महावितरणच्या (mseb) धुळे ग्रामीण विभागीय कार्यालय व साक्री उपविभाग यांच्यामार्फत राबवण्यात आली.
मोहिमेत अधीक्षक अभियंता, धुळे मंडळ कार्यकारी अभियंता, ग्रामीण विभाग यांच्यासोबत अतिरिक्त कार्यकारी अभियंता, चार उपकार्यकारी अभियंता, २२ अधिकारी आणि ११८ जनमित्र यांनी पोलिस (police) बंदोबस्तात भाग घेतला.
वीजचोरी पकडताना स्थानिक नागरिकांच्या विरोधाचा सामना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना करावा लागला. तथापि, पोलिस बंदोबस्तात मोहीम राबवून ५१ वीजचोरी प्रकरणे उघडकीस आणलेली आहेत. ह्या वीजचोरीच्या प्रकरणात दंडाची बिले देण्याचे काम प्रगतिपथावर असून सदर दंडाची वीजबिले न भरणाऱ्या ग्राहकांवर भारतीय विद्युत कायदा २००३ मधील कलम १३५ अन्वये एफआयआर दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता धनंजय भामरे यांनी दिली आहे.