नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शाळा अथवा विद्यालयांच्या परिसरातील पानटपरीधारक व तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ (Tobacco Products) विक्रेते अशा एकूण २६ जणांवर कारवाई (Action) करण्यात आली आहे. कोटपा कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली असून २३ हजार इतका दंड वसुल करण्यात आला असल्याचे जिल्हा नियंत्रण कक्षाच्या जिल्हा सल्लागार डॉ.शिल्पा बांगर यांनी सांगितले.
हे देखील वाचा : Nashik Accident News : ट्रक-मोटारसायकल अपघातात तिघांचा मृत्यू; एक गंभीर
नाशिक जिल्हा रूग्णालय (Nashik District Hospital) येथे कार्यरत असलेल्या तंबाखू नियंत्रण कक्ष, अन्न व औषध प्रशासन विभाग, पोलिस विभाग, नाशिक व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने सिडको व पाथर्डी येथील विविध भागात विशेषतः जेथे जेथे शाळा व महाविद्यालय आहेत, अशा ठिकाणी कोटपा कायदा २००३ नुसार दोन दिवसीय धाडसत्र मोहिम डीसीपी क्राईम प्रशांत बच्छाव, ए.पी आय. हेमंत नागरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चारूदत्त शिंदे, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक निलेश पाटील, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त लोहकरे यांच्या सहकार्य व मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले.
हे देखील वाचा : Rain News : नाशकात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची ‘जोर’धार; नागरिकांची तारांबळ
दरम्यान, यात अन्न व औषध प्रशासन विभागाचे (Department of Food and Drug Administration) गोपाल कासार, पोलिस विभागाचे पोलिस कॉन्स्टेबल गणेश बडगे, हेडकॉन्स्टेबल संजय तागणे, मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबादचे अनिल गुंजे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बेंडाळे, पोना १९४१ कोल्हे विशेष पथक, जिल्हा नियंत्रण कक्षाचे जिल्हा सल्लागार डॉ. शिल्पा बांगर, सामाजिक कार्यकर्त्या उज्ज्वला पाटील, पोलिस कॉन्स्टेबल बाला नोंद्रे आदी सहभागी होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा