Friday, September 11, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAnjali Damania: राज्यात आणखी एक मोठा घोटाळा; “मुंबईतील ५०० कोटींचं रुग्णालय अजित...

Anjali Damania: राज्यात आणखी एक मोठा घोटाळा; “मुंबईतील ५०० कोटींचं रुग्णालय अजित पवारांच्या पुतण्याला?” अंजली दमानियांचा गंभीर आरोप

मुंबई | Mumbai
मुंबईच्या गोवंडी परिसरात बीएमसीने तब्बल ५०० कोटी खर्चून उभारलेले शताब्दी रुग्णालय ५८०-बेडेड मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. हे सार्वजनिक निधीतून उभारलेले रुग्णालय पीपीपी (पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप) मॉडेलवर खासगी हातात देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.

मुंबई महानगरपालिकेने ५०० कोटी रुपये खर्च करून बांधलेले शताब्दी रुग्णालय पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) या तत्वानुसार चालवण्यासाठी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टने रस दाखवला असल्याची एक बातमी नुकतीच एका वृत्तपत्राने प्रसिध्द केली होती. याच्या अधारे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.

- Advertisement -

अंजली दमानियांची पोस्ट
शताब्दी रुग्णालय हे पीपीपी तत्वानुसार चालवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने निविदा मागवल्या होत्या. त्यासाठी तीन निविदा आल्या होत्या. त्यापैकी एक निविदा ही तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्र्स्टची होती. ही ट्रस्ट पद्मसिंह पाटील यांची असून ते अजित पवारांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांचे सावत्र बंधू आहेत. तर, पद्मसिंह पाटलांचे पुत्र तथा अजित पवारांचे पुतणे राणा जगजीतसिंह पाटील हे या ट्रस्टचा कारभार पाहतात. राणा पाटील हे भारतीय जनता पार्टीचे नेते असून ते तुळजापूरचे आमदारही आहेत. यावरून अंजली दमानिया यांनी म्हटले आहे की “राज्यातील आणखी एक रुग्णालय अजित पवारांच्या नातेवाईकांना दिले जाणार आहे.”

दमानियांची मुख्यमंत्र्यावर टीका
अंजली दमानिया यांनी यासंदर्भात केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की “आता आणखी एक ५०० कोटी रुपयांचं हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना? शताब्दी हॉस्पिटल हे एक ५८० बेडचे हॉस्पिटल आहे, जे बृहन्मुंबई महानगरपालिकेने बांधले आहे. विरोध असताना देखील हे रुग्णालय पीपीपी तत्वाने देण्याचा घाट घातला आणि योगायोगाने यात पद्मसिंह पाटील यांच्या तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टने बोली लावली आहे. याच रुग्णालयाच्या जवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक रुग्णालय बांधत आहे आणि हे तयार रुग्णालय अजित पवारांच्या नातेवाईकांना बहाल केले जात आहे. मुख्यमंत्री फडणवीसची, तुम्ही एक काम करा, एकदाचा अख्खा महाराष्ट्र या सगळ्या राजकारण्यांच्या घशात घालून मोकळे व्हा.”

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

BRICS

BRICKS Summit 2026: BRICSचा महासंगम! मोदी, पुतीन, शी जिनपिंग एकाच मंचावर...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiभारताच्या अध्यक्षतेखाली १८वी BRICS शिखर परिषद (18th BRICKS Summit 2026) १२ आणि १३ सप्टेंबर २०२६ रोजी नवी दिल्लीतील भारत...