Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याIndia Alliance March : मुंबईत इंडिया आघाडीची पदयात्रा; पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड

India Alliance March : मुंबईत इंडिया आघाडीची पदयात्रा; पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड

मुंबई | Mumbai

राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत इंडिया आघाडीकडून (India Alliance) पदयात्रा काढण्यात आली आहे. ‘मैं भी गांधी’ असे या पदयात्रेला (Walk) नाव देण्यात आले असून पदयात्रेत इंडिया आघाडीचे सगळ्याच घटक पक्षांचे नेते, कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. मेट्रो सिनेमा ते मंत्रालयाजवळील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यापर्यंत ही पदयात्रा काढण्यात आली आहे. मात्र, याच पदयात्रेदरम्यान इंडिया आघाडीचे कार्यकर्ते आणि पोलीस आमनेसामने आले आहेत. त्यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे…

- Advertisement -

Raj Thackeray : “…म्हणूनच गांधीजींसारखं बहुदा दुसरं कुणी होणे नाही”; राज ठाकरेंची महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त खास पोस्ट

मुंबईच्या मेट्रो सिनेमापासून (Metro Cinema) पुढे कार्यकर्ते पदयात्रेसाठी चालायला लागले. त्यानंतर फॅशन स्ट्रीटजवळ सर्व कार्यकर्ते पोहोचले. यानंतर पोलिसांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांसोबत बोलण्याचा प्रयत्न केला. तसेच पदयात्रा देखील आडवली. त्यानंतर इंडिया आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले. यानंतर पोलिसांनी (Police) कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.जमावबंदीचे आदेश लागू असल्याचे सांगत पोलिसांकडून कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

Rain Alert : राज्यासाठी पावसाचे पुढील ४८ तास महत्त्वाचे; ‘या’ भागांत अतिवृष्टीचा इशारा

दरम्यान, इंडिया आघाडीच्या या मोर्चासाठी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड, ठाकरे गटाचे नेते आणि आमदार सचिन अहिर काँग्रेस नेते अस्लम शेख यांच्यासह आदी नेते पदाधिकारी, कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले आहेत. यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर दुसरीकडे या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकरली होती. मात्र, तरीसुद्धा हा मोर्चा काढण्यात आला आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Nashik News : नाशिक-पेठ महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

- Advertisment -

ताज्या बातम्या