जळगाव । प्रतिनिधी jalgaon
श्री माहेश्वरी विवाह सहयोग समितीची सर्वसाधारण बैठक रविवार पार पडली. या बैठकीत समाजातील विवाह इच्छुक युवक युवतींचा 29 वा परिचय संमेलन दि. 13 ऑगस्ट रोजी होणार आहे. या संमलेलनात पैस, श्रम आणि वेळेची देखील बचत करता येणार आहे. तसेच सामूहिक विवाह वसंत पंचमी दि.14 फेब्रुवारी 2024 रोजी होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.
विविध समिती गठीत : परिचय संमेलनाचे प्रकल्प प्रमुख प्रा. संजय दहाड, सहप्रकल्प प्रमुख विशाल मंत्री, प्रशांत बियाणी यांची तर सामूहिक विवाहाचे प्रकल्प प्रमुख ईश्वर लाठी व सहप्रकल्प प्रमुख सुरजमल सोमाणी यांचे नाव निश्चित केले आहे. बैठकीत कोऑर्डिनेशन समिती, प्रचार व प्रसार समिती, कंट्रोल पॅनल समिती, जाहिरात समिती, विवरणिका समिती, भोजन समिती, निवास व्यवस्था
श्री माहेश्वरी विवाह सहयोग समितीचे अध्यक्ष मनीष झवर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी मंचावर माजी महापौर नितीन लढ्ढा, सचिव डॉ.जगदीश लढ्ढा, उपाध्यक्ष प्रमोद झंवर, कोषाध्यक्ष विवेकानंद सोनी, सहकोषाध्यक्ष वासुदेव बेहेडे, सहसचिव तेजस देपुरा, प्रकल्प प्रमुख प्रा. संजय दहाड उपस्थित होते. माहेश्वरी समाजाचे सदस्य अशोक राठी, संजय काबरा व नितीन करवा जळगाव, एरंडोल व धरणगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक पदी निवडून आले त्यांचा सत्कार बैठकीत करण्यात आला.यावेळी प्रा.बी.जे.लाठी, सुभाष मु.जाखेटे, सुरजमल सोमाणी, एड. राहुल झवर, जगदीश जाखेटे, नारायण सोमाणी, विनोद मुंदडा राधेश्याम बजाज, गिरीश झवर, योगेश कासट, जगदीश जाखेटे, प्रदीप मणियार, सुनील कासट, दीपक कासट, सुभाष जाखेटे, अजय दहाड, ईश्वर लाठी, लोकेश राठी, माणकचंद झवर, नितीन बेहेडे, शैलेश काबरा, योगेश मंडोरा, गोविंद लाठी, चेतन दहाड, हर्षल जाखेटे, वासंती बेहेडे, कमला जाखेटे, उर्मिला झवर, विशाल मंत्री, प्रशांत बियाणी, महेश आर. मंडोरा, शिवनारायण तोष्णीवाल, नरेंद्र काबरा, मधुर झवर, पंकज कासट, राधेश्याम सोमाणी, भारती झवर, रुपाली लाठी, सपना लाठी, सारिका मंडोरा, सायली झवर, नम्रता कासट, रेश्मा जाखेटे, मनीषा बेहेडे, सपना दहाड, राखी सोमाणी, शीतल कासट, निधी भट्टड, स्वाती लाठी व मोठ्या संख्येने समिती सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते. सुत्रसंचलन व आभार तेजस देपुरा यांनी मानले.
ही आहेत संमेलनाची वैशिष्टये
संमेलनात पैसा, श्रम आणि वेळेची बच,सुलभ ऑनलाइन पंजीयन, युवक-युतींचा फोटो सहित रंगीत विवरणिका उपलब्ध,युवक-युवती आणि त्यांच्या परिजनांची आपसी ऑनलाईन मीटिंग व मंत्रणाची व्यवस्था, आवश्यकता नुसार ऑनलाइन मीटिंग/ मंत्रणा कॉर्डिनेटर उपलब्ध, परिचय संमेलनानंतर एक महिन्यासाठी माहेश्वरी विवाह सहयोग प विनामूल्य उपयोग करता येणार आहे.