Friday, April 25, 2025
Homeमनोरंजनदिलीपकुमार रुग्णालयात दाखल

दिलीपकुमार रुग्णालयात दाखल

मुंबई :

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांनी प्रकृती अस्वास्थामुळे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

मराठा आरक्षण : मी संयमी, पण इथून पुढे तुम्ही संयम पाहणार नाहीत

सकाळी त्यांना रुग्णालयात आणण्यात आलं. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या डॉक्टर त्यांच्यावर उपचार करण्यात असल्याची माहिती समोर आली आहे.दिलीप कुमार यांच्या शरीरात हिमोग्लोबिनचं कमतरता आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून दर महिन्याला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येतं.

सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्या प्रकृतीबाबत सांगितले की, डॉ. नितिन गोखले यांच्या देखरेखीखाली दिलीप कुमार यांच्या सगळ्या चाचण्या करण्यात येत असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तुम्ही सर्वजण त्यांच्यासाठी प्रार्थना करा की, ते लवकर ठिक होवोत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...