Friday, January 17, 2025
Homeब्रेकिंग न्यूजActor Govinda: अभिनेता गोविंदाच्या बंदुकीतून मिसफायर; पायात गोळी घुसल्याने रुग्णालयात दाखल

Actor Govinda: अभिनेता गोविंदाच्या बंदुकीतून मिसफायर; पायात गोळी घुसल्याने रुग्णालयात दाखल

मुंबई | Mumbai
बॉलिवुड अभिनेता गोविंदा याच्याकडून चुकून मिसफायर झाले असून त्याच्या स्वतःच्याच पायाला गोळी लागल्याची घटना घडली आहे. सध्या गोविंदावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्याच्यावर तातडीची शस्रक्रिया देखील पार पडल्याची माहिती मिळत आहे. पहाटे पावणे पाच वाजता ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदा एका कामानिमित्त कोलकाताला जाण्यासाठी घरातून निघत होता. त्यावेळी तो नेहमीप्रमाणे परवाना असलेली बंदुक स्वत:सोबत घेत होता. ही बंदुक त्याच्या हातातून निसटली आणि त्यातून त्याच्या पायाला गोळी लागली. त्याला CRITI केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. गोविंदाला गोळी लागल्याचे वृत्त कळताच त्याचे चाहते चिंतेत आले आहेत. तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

- Advertisement -

ज्या वेळी ही घटना घडली तेव्हा गोविंदा घरी एकटाच होता. यावेळी तो परवाना असलेली बंदुक साफ करत होता. बंदुक साफ करत असताना अचानक गोळी सुटली आणि पायाला लागली. जखमी झालेल्या गोविंदाने शेजारी राहणाऱ्या त्याच्या नातेवाईकांना बोलावले. नातेवाईकांनी गोविंदाच्या घरी धाव घेत त्याला रुग्णालयात नेले. सध्या या घटनेवर गोविंदाचे नातेवाईक किंवा जवळच्या मित्र परिवाराकडून काहीच माहिती मिळाली नाही.

मुंबई पोलीस अधिकाऱ्यांनी गोविंदा यांची प्रकृती ठीक असून त्यांना गंभीर दुखापत झाली नसल्याची पुष्टी केली आहे. पण, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, अशी माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या