Saturday, June 13, 2026
Homeजळगावचंद्रकांत पाटलांच्या प्रचारार्थ अभिनेता गोविंदाची एन्ट्री

चंद्रकांत पाटलांच्या प्रचारार्थ अभिनेता गोविंदाची एन्ट्री

मुक्ताईनगर । प्रतिनिधी

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यात हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते गोविंदा आहूजा हे उद्या दि.16 रोजी दाखल होत असून ते मुक्ताईनगर व बोदवड शहरात रोड शो करणार आहेत.
आ.चंद्रकांत पाटील मतदार संघातील प्रत्येक गावात गावकर्‍यांचा वाढता प्रतिसाद दिसून येत आहे. दि.15 रोजी बोदवड तालुक्यातील हिंगणे, नांदगाव, नाडगाव या गावांमध्ये प्रचार रॅली काढली.

- Advertisement -

अभिनेता गोविंदा यांचे होणार आगमन
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते गोविंदा आहूजा हे उद्या दि.16 नोव्हेंबर रोजी मुक्ताईनगर व बोदवड शहरात दाखल होत आहेत. मुक्ताईनगर शहरात सकाळी नऊ वाजता नागेश्वर मंदिर जुने गाव येथून रोड शोला सुरुवात होईल तर त्यानंतर बोदवड येथील सिनेमा टॉकीज शालिमार येथून सकाळी दहा वाजता आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ रोड शो करणार आहेत. यामध्ये महायुतीचे घटक पक्ष असलेले भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), रि.पा.ई.(आठवले गट)चे सर्व पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आ.चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या कालावधीत अनेक विकास कामे केली. जनतेने पुन्हा सेवेची संधी दिल्यास उर्वरित राहिलेला विकास मार्गी लावण्यासाठी पुन्हा जनतेच्या दरबारात जात आहेत.

ताज्या बातम्या

संपादकीय : १३ जून २०२६ – खांद्यावरील जू उतरले, पण व्यवस्थेचे...

0
लातूर जिल्ह्यातील शेतकरी काशिनाथ गायकवाड व त्यांच्या अर्धांगिनी हौसाबाई यांचे जे चित्र समाज माध्यमे आणि वृत्तपत्रांमध्ये झळकले, ते आधुनिक, प्रगत आणि डिजिटल भारताचा दावा...