दिल्ली l Delhi
भारतामध्ये करोनाच्या दुसर्या लाटेचा कहर अजूनही सुरू आहेच. देशात सतत वाढत असलेल्या करोना प्रादुर्भावा दरम्यान आता बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रनौत देखील करोनाच्या विळख्यात अडकली आहे.
तिने स्वतः ही माहिती सोशल मीडियाच्या माधमातून दिली आहे. तिने स्वत:ला होम क्वारंटाईन केले असून डॉक्टरांच्या सल्ल्याखाली ती सर्व नियमांचे पालन करत उपचार घेत आहेत.
कंगनाला Twitter चा दणका; अकाऊंट सस्पेंड
कंगनाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती ध्यानधारणा करताना दिसत आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘गेल्या काही दिवसांपासून मला थकवा आणि क्षीण जाणवत होता. डोळ्यांत जळजळसुद्धा होत होती. मला हिमाचलला जायचं होतं, म्हणून काल मी कोरोना चाचणी केली. त्याचा रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आला आहे. मी स्वत:ला क्वारंटाइन करून घेतलंय आणि या विषाणूचा माझ्या शरीरात शिरकाव कसा झाला हे मला कळलंच नाही. आता त्यावर मात करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. जर तुम्ही घाबरलात तर ती गोष्ट तुम्हाला अधिक घाबरवेल. त्यामुळे स्वत:वर कोणत्याही गोष्टीला जास्त अधिकार गाजवू देऊ नका. सर्वांनी मिळून या करोना विषाणूला संपवूया’,
बॉलिवूडमध्ये करोनाचा विळखा अधिकच घट्ट होऊ लागला आहे. अनेक दिग्दर्शक, अभिनेते करोनाशी झुंज देत आहे. काल शिल्पा शेट्टी हिच्या कुटूंबाला करोनाची लागण झाली आहे.