Thursday, May 1, 2025
Homeमनोरंजनदाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूला मातृशोक

दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूला मातृशोक

मुंबई | Mumbai

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत लोकप्रिय अभिनेता महेश बाबू यांची आई इंदिरा देवी यांचे निधन झाले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून त्यांची तब्येत खराब होती. त्यांच्यावर हैदराबाद (Hyderabad) येथील एआयजी रुग्णालयात उपचार सुरू होते.

- Advertisement -

त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना काही काळ व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते, मात्र आज पहाटे ४ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचं पार्थिव आज सकाळी 9 वाजता पद्मालय स्टुडिओमध्ये चाहत्यांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून नंतर महाप्रस्थानम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती महेश बाबूच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

२०२२ हे वर्ष महेश बाबूसाठी अतोनात दु:ख घेऊन आले आहे. वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात महेश बाबूने त्याचा भाऊ रमेश बाबूला गमावले. आता त्याच्या सर्वात जवळच्या आणखी एका व्यक्तीचे निधन झाले आहे. महेशच्या आईच्या निधनाचे वृत्त समजताच चाहते दु:ख व्यक्त करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पिक विम्याचा हप्ता वाढवा पण वरदान ठरणारे ट्रीगर सुरू ठेवावेत

0
पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal राज्य सरकारने एक रुपयातील पिक विमा योजना बंद करण्याचा निर्णय घेवुन या पीक विमा योजनेतील शेतकर्‍यांना संकट काळात सर्वाधिक नुकसान...