Wednesday, April 2, 2025
Homeमनोरंजनबॉलिवूडवर शोककळा! 'या' प्रसिद्ध अभिनेत्याचे कॅन्सरने निधन

बॉलिवूडवर शोककळा! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचे कॅन्सरने निधन

मुंबई | Mumbai

टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करणारे प्रसिद्ध अभिनेते मंगल ढिल्लन (Actor Mangal Dhillon) यांचे निधन (Passed Away) झाले आहे. बऱ्याच काळापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. अखेर त्यांची कर्करोगाशी ही झुंज अयशस्वी ठरली आहे…

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेते यशपाल शर्मा (Actor Yashpal Sharma) यांनी त्यांच्या मृत्यूला (Death) दुजोरा दिला असून त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे मंगल ढिल्लन यांचे निधन झाल्याची बातमी चाहत्यांना दिली आहे. मंगल ढिल्लन यांनी रेखाच्या १९८८ मध्ये आलेल्या ‘खूब भरी मांग’ चित्रपटात कॅमिओ केला होता. त्यानंतर अनेक मालिका आणि चित्रपटातून मंगल घराघरात पोहचले होते.

मंगल ढिल्लन हे पंजाबमधील (Punjab) फरीदकोटचे रहिवासी होते. त्यांचा जन्म पंजाबमधील फरीदकोट जिल्ह्यातील वांडर जटाना गावात शीख कुटुंबात झाला. त्यांचे चौथी पर्यंतचे शिक्षण पंज ग्रामीण कलान सरकारी शाळेत झाले. यानंतर ते वडिलांसोबत उत्तरप्रदेशला (UP)गेले. त्याठिकाणी हायस्कूल पूर्ण केल्यानंतर ते पंजाबला पुन्हा परत आले. त्यानंतर त्यांनी दिल्लीत थिएटरमध्ये काम केले आणि १९७९ मध्ये पंजाब विद्यापीठ चंदीगड येथे भारतीय नाट्य विभागात प्रवेश घेतला आणि १९८० मध्ये अभिनयाचा डिप्लोमा पूर्ण केला होता.

Biparjoy Cyclone : ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाची तीव्रता वाढली, दिसणार अती रौद्ररुप… महाराष्ट्रात काय होणार परिणाम?

दरम्यान, मंगल ढिल्लन यांना बुनियाद या लोकप्रिय मालिकेतून ओळख मिळाली. यानंतर त्यांनी किस्मत, द ग्रेट मराठा, मुजरिम हाजीर, रिश्ता मौलाना आझाद, नूरजहान यांसारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले. त्यानंतर त्यांनी १९८८ मध्ये आलेल्या खून भरी मांग या चित्रपटात काम केले होते. याशिवाय घायल महिला, दयावान, आझाद देश के गुलाम, प्यार का देवता, अकेला, दिल तेरा आशिक, दलाल, विश्वात्मा, निशाना यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Waqf Amendment Bill : ‘वक्फ’ म्हणजे काय? विधेयकात नेमकं काय आहे?...

0
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi वादग्रस्त वक्फ मंडळ दुरुस्ती विधेयक (Waqf Amendment Bill) आज केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू (Kiran Rijiju) यांनी लोकसभेत...