Thursday, May 1, 2025
Homeमनोरंजनबॉलिवूडमध्ये खळबळ! काजोलसोबत काम केलेल्या अभिनेत्रीने संपवले स्वत:चे आयुष्य

बॉलिवूडमध्ये खळबळ! काजोलसोबत काम केलेल्या अभिनेत्रीने संपवले स्वत:चे आयुष्य

मुंबई । Mumbai

बॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री काजोलच्या ‘द ट्रायल’ या वेब सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणाऱ्या नूर मालाबिकाने मुंबईतील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे.

- Advertisement -

पोलिसांना तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला असून नूर मालाबिकाने इतके टोकाचे पाऊल का उचलले असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तिच्या निधनाने बॉलिवूडला धक्का बसला आहे.

या प्रकरणात सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणात काही मोठे खुलासे देखील होऊ शकतात. नूर मालाबिका दास ही मुळ आसामची आहे. सोशल मीडियावर नूर मालाबिका सक्रिय असून आपल्या चाहत्यांसोबत प्रत्येक अपडेट शेअर करताना दिसत होती.

३७ वर्षीय नूर मालाबिका कतार एयरवेजमध्ये एअरहॉस्टेस होती. तिने अनेक हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केले होते. यामध्ये ‘सिसकियां’, ‘वॉकमैन’, ‘तीखी चटनी’, ‘जघन्या उपाय’, ‘चरमसुख’, ‘देखी अनदेखी’, ‘बॅकरोड हलचल’ या चित्रपटांचा समावेश आहे. त्याच वेळी, ती डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रसारित ‘द ट्रायल’ मध्ये काजोल आणि जिशु सेनगुप्तासोबत दिसली होती.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Waves Summit 2025 : मनोरंजनाची सर्वसमावेशक चळवळ

0
मनोरंजन व्यवसायात योगदान देणार्‍या विविध घटकांना एका मंचावर आणून त्यांना परस्पर सहकार्याची आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या देवाण-घेवाणीची संधी उपलब्ध करून देणार्‍या वेव्हज शिखर परिषद आणि...