Wednesday, March 26, 2025
Homeमनोरंजनकंगना राणी लक्ष्मीबाई आहे तर मग..

कंगना राणी लक्ष्मीबाई आहे तर मग..

मुंबई | Mumbai

प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज आपल्या अभिनायाबरोबरच राजकारणातही बरेच अ‍ॅक्टिव असतात. तसेच जबरदस्त कामासाठी आणि सरकार विरोधातील वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांनी नुकतीच कंगना रनौत आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील वादावर कमेंट केली आहे . त्यांनी आता कंगनाला टार्गेट करत एक मीम शेअर केलंय. ज्यात कंगना राणी लक्ष्मीबाई असल्याचं सांगण्यावरून खिल्ली उडवली आहे.

- Advertisement -

प्रकाश राज यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक मीम शेअर केलंय ज्यावर म्हंटले आहे की, “कंगना जर सिनेमा करून स्वत:ला राणी लक्ष्मीबाई समजत असले तर या हिशेबाने दीपिकाही पद्मावती, हृतिक अकबर, शाहरूख अशोक, अजय देवगन भगत सिंह, आमिर खान मंगल पांडे आणि विवेक ओबेरॉय मोदीजी झालेत.” प्रकाश राज यांच्या या पोस्टवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

या आधी प्रकाश राज यांनी कंगनाला Y दर्जाची सुरक्षा दिल्यावरही तिखट प्रतिक्रिया दिली होती.

अभिनेते प्रकाश राज हे लोकसभा निवडणुकीत बंगळुरू मध्यतून उभे होते. पण त्यांना यात पराभवाचा सामना करावा लागला होता. कामाबाबत सांगायचं तर प्रकाश राज हे आगामी ‘केजीएफ २’ मध्ये दिसणार आहेत. यात सुपरस्टार यशसोबत संजय दत्त मुख्य भूमिकेत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 99 ग्रामपंचायतींची आज अंतिम मतदार यादी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणार्‍या, नवनिर्मित, मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे, तसेच बहिष्कार व इतर कारणांमुळे निवडणुका...