Friday, November 22, 2024
Homeमनोरंजनअभिनेता राजपाल यादवची करोडोंची संपत्ती जप्त; कारण काय?

अभिनेता राजपाल यादवची करोडोंची संपत्ती जप्त; कारण काय?

मुंबई । Mumbai

कॉमेडीचा बादशाह आणि हिंदी चित्रपटांमध्ये (Hindi Movie) प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) यांच्या जवळील करोडोंची संपत्ती बॅंकेकडून जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, राजपाल यादवने अता पता लापता या सिनेमासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या (Central Bank of India) मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स शाखेतून मोठे कर्ज घेतले होते. त्या बदल्यात राजपाल यादवने वडील नौरंग यादव यांच्या नावावर जमीन बँकेत हमी म्हणून ठेवली होती, मात्र ही रक्कम न भरल्याने राजपाल यादववर ही कारवाई करण्यात आली आहे.

राजपाल यादवची ही जमीन शाहजहानपूरच्या पॉश भागात आहे. वेळेवर रक्कम जमा करू न शकल्यामुळे बँकेने २ दिवसांपूर्वी शाहजहांपूरची त्याची संपत्ती जप्त केली. मुंबई शाखेने या जागेला टाळे ठोकल्याचेही बोलले जात आहे.

हे ही वाचा : Hindenburg Report च्या आरोपांवर सेबीच्या अध्यक्षा माधवी बुच काय म्हणाल्या?

‘बँकेची मालमत्ता’ असे बॅनरही त्यांनी लावले आहे. याशिवाय बँक राजपाल यादववर कठोर कारवाईही करू शकते, असे मानले जात आहे. हे पैसे वेळेवर जमा न केल्यास अभिनेत्याला तुरुंगात जावे लागू शकते, असे मानले जात आहे.

राजपाल यादव यांचा जन्म १६ मार्च १९७१ रोजी उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर नावाच्या एका छोट्या गावात झाला होता. राजपाल यादव यांचे बालपण अतिशय खडतर होते. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अगदीच बिकट होती. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती इतकी हालाखीची होती की, त्यांच्याकडे स्वतःचे घर देखील नव्हते.

हे ही वाचा : हाथरसची पुनरावृत्ती! सिद्धनाथ मंदिरात चेंगराचेंगरी, सात भाविकांचा मृत्यू

दोन वेळेच्या अन्नासाठी त्यांचे कुटुंब खूप काबाडकष्ट करायचे. १९९९मध्ये दिग्दर्शक प्रकाश झा यांनी राजपाल यादवला त्यांच्या ‘दिल क्या करे’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर ब्रेक दिला. ‘दिल क्या करे’ हा राजपाल यादव यांच्या कारकिर्दीतील पहिला चित्रपट ठरला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या