Monday, March 31, 2025
Homeनगरसाईबाबांचे व माझे अतूट नाते असे म्हणत राणी झाली भावनाविवश

साईबाबांचे व माझे अतूट नाते असे म्हणत राणी झाली भावनाविवश

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- मी लग्नानंतर प्रथमच साईबाबांच्या दर्शनाला आले असून साईबाबांचे आणि माझे एक अतूट नाते असल्याने माझ्या डोळ्यात अश्रू ढाळले असल्याचे वक्तव्य बॉलीवुडची सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री राणी मुखर्जी हिने शिर्डीत केले.

हिंदी चित्रपट सृष्टीतील सिनेतारका राणी मुखर्जी हिने मध्यान्ह आरतीनंतर साईदरबारी हजेरी लावत साई समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी राणी मुखर्जीचा साईबाबा संस्थानच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर व त्यांच्या पत्नी जयश्री मुगळीकर यांनी शाल व साईंची मूर्ती देऊन सत्कार केला. यावेळी मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी आकाश किसवे, दिलीप उगले, मंदिर सुरक्षेचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर गंगावणे आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

राणी मुखर्जी साईबाबांची नि:स्सीम भक्त असून दहा वर्षांपूर्वी तिने साईंच्या पुण्यभूमीत वास्तव्य करण्याचे ठरविले होते आणि त्यासाठी जागाही खरेदी केली आहे. दरम्यान बाबांवरील अपार श्रद्धा असलेल्या राणीने काल साई मंदिरात जाऊन साई समाधीचे दर्शन घेतले. यावेळी बाबांच्या समाधीसमोर हात जोडलेले असताना राणीच्या डोळ्यातून अश्रूंंच्या धारा वाहत होत्या.अश्रू पुसतच साईंचे दर्शन घेतल्याचे चित्र पहावयास मिळाले.

शिर्डीत घर लवकर बांधून व्हावे
दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना राणी म्हणाली की, माझे लग्न झाले असून मला एक मुलगी आहे. लग्नानंतर मी प्रथमच साईबाबांच्या दर्शनासाठी आले. साईबाबांच्या दर्शनासाठी यायचं होतं आणि बाबांनी मला बोलावून घेतल्याचे सांगत साईबाबांना धन्यवाद दिले असल्याचे सांगितले. दरम्यान शिर्डी येथील माझे घर लवकर बांधून व्हावे यासाठी आपण प्रार्थना केली असल्याचे तिने सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shirdi News : शिर्डी विमानतळावरून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाईट लँडीगची गुढी

0
रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे असलेल्या शिर्डी विमानतळावरुन रविवारी 30 मार्चपासून नाईट लँडीग सुरू झाली असून हैदराबादवरुन इंडीगो एअरलाईनचे विमान 56...