Friday, November 22, 2024
HomeराजकीयRiteish Deshmukh : लोक धर्माचं पाहून घेतील, तुम्ही रोजगार, पिकाच्या….; रितेश देशमुख...

Riteish Deshmukh : लोक धर्माचं पाहून घेतील, तुम्ही रोजगार, पिकाच्या….; रितेश देशमुख तुफान बरसले, भाषणाची चर्चा

लातूर । Latur

विधानसभा निवडणुकांच्या मतदानाचा दिवस जसजसा जवळ येतोय, तसतसा प्रचाराचा जोरही वाढत जातोय. सगळेच पक्ष सध्या दंड थोपटून प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत.

- Advertisement -

नेते मंडळींच्या भाषणांमधून रोज एकमेकांवर टीकांचा पाऊस पडतोय. त्यातच आता प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख यांच्या भाषणाची जोरदार चर्चा रंगली आहे. लातूरमध्ये धिरज देशमुख यांच्या प्रचारासाठी काँग्रेसची सभा पार पडली. या सभेमध्ये रितेश देशमुखही उपस्थित होते. यावेळी रितेश देशमुख यांनी चांगलीच फटकेबाजी केली.

भगवान श्रीकृष्णाचा दाखला देऊन रितेश देशमुख म्हणाले, कर्म हाच धर्म आहे. काम करत राहणे म्हणजे कर्म करणे आणि कर्म म्हणजेच धर्म. जो प्रामाणिकपणे काम करतो, त्यालाच धर्म करणे म्हणतात. पण जो काम करत नाही त्याला गरज पडते धर्माची. सगळे म्हणतात की धर्म धोक्यात आहे, प्रत्येक पक्ष म्हणतो धर्म धोक्यात आहे. धर्म बचाव, धर्माला वाचवा, असं म्हटलं जातंय. आमचा धर्म आम्हाला प्रिय आहे. प्रत्येक व्यक्तीला आपला धर्म प्रिय असलाच पाहिजे. खरं म्हणजे ते (राजकीय पक्ष) धर्माला प्रार्थना करतात की, आमचा पक्ष धोक्यात आहे, आम्हाला वाचवा. काही गरज नाही अशा भुलथापांना बळी पडायची.

रितेश देशमुख मतदारांना आवाहन करताना म्हणाले, जे धर्माची गोष्ट करतात, त्यांना सांगा धर्माचं आम्ही बघून घेतो, आधी आमच्या कामाचं बोला. आमच्या पिक-पाण्याला काय भाव देणार, आमच्या आई-बहिणी सुरक्षित आहेत की नाही, हे सांगा. २० नोव्हेंबरनंतर धीरज देशमुख यांच्याकडे फार मोठी जबाबदारी येणार आहे. अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांच्याकडे काम करण्याची धमक आहे. यावेळी सरकार महाविकास आघाडीचंच येणार, याबद्दल मला शंका नाही. असाही रितेश देशमुख म्हणाले.

लोकसभेला जे वारं होतं आता विधानसभेला झापुक झुपुक झालं पाहिजे. आता समोर गुलिगत धोका आहे. त्या धोक्याला तुम्ही बळी पडू नका. आपले उमेदवार चांगले आहेत. ते तुमच्यासाठी काम करतात. यावेळेस एवढ्या जोरात बटण दाबा की, पुढच्या वेळेसच विरोधकाचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. सरकार हे महाविकास आघाडीचे येणार आहे. तुमचा पंजा भारी, माझा पंजा भारी, सगळ्यांचाच पंजा लय भारी, असं त्यांच्याच चित्रपटातील संवाद म्हणत त्यांनी त्यांच्या भाषणाची सांगता केली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या