Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजअभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

मुंबई । प्रतिनिधी

- Advertisement -

गेले अनेक वर्षे अभिनय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली या परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, खासदार प्रफुल्ल पटेल असे दिग्गज नेते उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत अभिनेता सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.सयाजी शिंदे यांच्या पक्षप्रवेशावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुरुवातीला त्यांचं स्वागत केलं. सयाजी शिंदे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात(अजित पवार गट) प्रवेशामुळे पक्षालादेखील फायदा होण्याची शक्यता आहे.

यावेळी अजित पवार यांनीदेखील भूमिका मांडली. मी चित्रपट पाहत नाही पण सयाजीराव यांचे अनेक चित्रपट बघितले आहेत. त्यांच्या कारकिर्दीत अनेक सामाजिक कामात त्यांची माझी भेट झाली. मुळात सयाजीरावांना झाडाची आवड आहे. सह्याद्री देवराई याच्या माध्यमातून राज्यभर वृक्षारोपण करतात. त्यांचं मोठं काम आहे. सयाजी शिंदे राज्यभर पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून काम करतील अशी घोषणा अजित पवारांनी यावेळी केली.

पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, उद्या दसरा आहे. आजच आम्हाला दसऱ्याचा उत्सव साजरा करण्याचं भाग्य लाभलं आहे. महाराष्ट्रा सोबतच दक्षिण भारतात ही सयाजी शिंदे यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. सयाजी शिंदे हे अभिनेते तर आहेच , परंतु ते आता ते नेते सुद्धा होणार आहे. नाव जरी मराठी असलं तरी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...