Sunday, November 24, 2024
Homeमनोरंजनसुबोध भावे 'या' वेबसिरीजद्वारे येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सुबोध भावे ‘या’ वेबसिरीजद्वारे येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई | Mumbai

मराठी चित्रपटसृष्टीतीत (Marathi film industry) आपल्या अभिनयाने नेहमी वेगळी छाप सोडणारे, सुबोध भावे आता नव्या भूमिकेत बघायला मिळणार आहेत. अनेक ऐतिहासिक (Historical) भूमिकांमधून भावेंनी प्रेक्षकांसमोर मनोरंजनाबरोबरच इतिहासाची साक्ष दिली आहे…

- Advertisement -

सुबोध भावेंनी (Subodh Bhave) आतापर्यंत  बालगंधर्व, लोकमान्य टिळक तसेच काशिनाथ घाणेकर अशा चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. अलीकडेच ‘हर हर महादेव’ या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) भूमिकेत सुद्धा सादर झाले. आता चित्रपटानंतर सुबोध भावे लवकरच एका ऐतिहासिक वेबसिरीजमध्ये झळकणार आहेत. नुकताच त्याच्या भूमिकेचा पहिला लूक समोर आला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशकात शिवजयंतीचा उत्साह; पाहा फोटो

नुकताच या वेबसिरीजचा ट्रेलर समोर आला आहे. सुबोध भावे यांची ही वेबसिरीज ‘ताज:डिव्हायडेड बाय ब्लड’ (Taj: Divided by Blood) अशी आहे. या सिरीजमध्ये भावेंची भूमिका बिरबल या पात्राची आहे. याविषयी एक पोस्ट देखील त्यांनी केली होती.

IND VS AUS : टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलियाचा सुफडा साफ, तीन दिवसात जिंकली कसोटी

या पोस्टमध्ये सुबोध भावेंनी लिहिले आहे, ‘लहापणापासूनच ज्याच्या गोष्टी ऐकल्या,ज्याच्या हुशारी वर प्रेम केलं त्या “बिरबल” (Birbal) ची व्यक्तिरेखा या आगामी वेब मालिकेमध्ये साकारताना अत्यंत आनंद होत आहे. त्यानंतर सुबोधच्या या पोस्टवर चाहत्यांनी  ‘रॉयल… खूप आवडला हा लूक! असे म्हणत भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

उद्धव ठाकरेंच्या गटाला ट्वीटरचा मोठा धक्का

दरम्यान, ‘ताज: डिव्हाइड बाय ब्लड’ची कथा मुघल (Mughal) काळातील सत्तानाट्यावर अवलंबलेली आहे. यामध्ये सम्राट अकबरची भूमिका नसीरुद्दीन शाह यांनी साकारली असून अदिती राव हैदरी ‘अनारकली’ बनली आहे. ही वेब सिरीज येत्या ३ मार्च २०२३ रोजी  प्रदर्शित होणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या