दिल्ली | Delhi
अभिनेता आणि राजकारणी असलेल्या कमल हसननं पुढील वर्षी होणाऱ्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याचे अभिनेता कमल हासनने म्हटले आहे. यासाठी सुपरस्टार रजनीकांत यांचे सहकार्यही घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कमल हासन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पुढच्या वर्षी मी विधानसभा निवडणूक लढवणार आहे.कमल हासन म्हणाले की, रजनीकांत यांच्याशी ते राजकारणाविषयी चर्चा करीत आहेत. त्यांनी राजकीय भूमिकेबाबत निर्णय घ्यायला हवा, असेही ते म्हणाले. मक्कल सुधी माइम पक्षाचे राजकारण आरोप करण्यासाठी किंवा सूडबुद्धीचे असणार नाही. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचेही कमल हासन यांनी सांगितले.
दरम्यान स्वत:चा पक्ष स्थापन केल्यानंतर कमल हसन लोकसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात स्वत: न उतरण्याचा निर्णय कमल हसननं घेतला होता. त्याऐवजी कमल हसन उमेदवारांच्या प्रचारावर लक्ष केंद्रीत केले होते. लोकसभा निवडणुकीकरता ४० जागांवर कमल हसन पक्षाचे उमेदवार उभे केले होते.