Tuesday, December 10, 2024
Homeदेश विदेशअभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांना सहा महिन्यांचा कारावास

अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांना सहा महिन्यांचा कारावास

नवी दिल्ली | New Delhi

अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदाला (Jaya Prada) चेन्नई कोर्टाने ६ महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच अभिनेत्रीला ५००० रुपयांचे दंड (5 thousand Fine & 6 Month Jail Term) देखील आकाराला आहे. चेन्नईमधील रायपेटा येथील जया प्रदा यांच्या मालकीच्या चित्रपटगृहातील कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या संदर्भात त्यांना पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. चित्रपटगृह चेन्नईचे राम कुमार आणि राजा बाबू चालवतात.

- Advertisement -

टेलिव्हिजन अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या (एसपी) माजी खासदार जया प्रदा यांना सहा महिन्यांचागवास झालाय. हे प्रकरण त्यांच्या मालकीच्या ‘जयाप्रदा’ थिएटर कॉम्प्लेक्सच्या व्यवस्थापनाशी संबंधित होते. या नाट्यगृहातील कामगारांचा ईएसआय हिस्सा जमा झाला नसल्याने हा खटला सुरू करण्यात आला.

मोठी बातमी! नवाब मलिक यांना जामीन मंजूर

तत्पूर्वी, जयाप्रदा यांच्यासह तिघांनी मद्रास उच्च न्यायालयात या खटल्याची बाजू मांडली आणि ती फेटाळण्यात आली. मात्र, चेन्नई एग्मोर कोर्टाने जयाप्रदा यांना आता सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्याचे आदेश दिले आहेत. जया प्रदा आणि इतर दोघांना रु. प्रत्येकी ५००० दंड भरण्याचे आदेश दिले आहेत.

जया प्रदा यांनी दोन वेळा लोकसभेत समाजवादी पार्टीकडून रामपूरचे प्रतिनिधित्व केले आहे. २००४ आणि २००९साली काँग्रेस उमेदवाराचा पराभव करत या जागांवर विजय प्राप्त केला होता. त्यानंतर सपाने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या