मुंबई । Mumbai
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन अनेकदा सोशल मीडियावर आपल्या रागामुळे चर्चेत असतात. कधी पापाराझींवर तर कधी त्यांच्या चाहत्यांवर त्या रागवताना दिसून येतात. त्यामुळे बहुतेक लोकांना त्यांचे वागणे आवडत नाही. अनेकदा जया बच्चन यांना त्यांच्या रागामुळे सोशल मीडियावर ट्रोल देखील केले गेले आहे. जया बच्चन यांच्या रागाचा असाच आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जया बच्चन पापाराझींवर ओरडताना दिसत आहेत.
करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ खास स्क्रिनिंग सेलेब्रिटींसाठी आयोजित करण्यात आले होते. यासाठी जया बच्चन यांनी थिएटरमध्ये एन्ट्री केली तेव्हा पापाराझींनी मोठी गर्दी केली होती. प्रत्येकजण सेलेब्रिटींना क्लिक करण्यात गुंतला होता. जयाच्या मागून त्यांची मुलगी श्वेता आणि अभिषेक बच्चन येत होते. मिळून पुढे जायचे म्हणून जया थोडावेळ थांबल्या होत्या. इतक्यात पापाराझींनी मोठ मोठ्याने त्यांना हाक मारुन फोटोसाठी विनंती केली. मात्र त्यांना असे बोलवणे आवडले नाही. जय बच्चन म्हणाल्या, ‘आय एम नॉट ए डीफ. चिल्लाओ मत, आराम से बात करो.’ त्यानंतर श्वेता आणि अभिषेक जयाकडे चालत आले आणि तिघे मिळून थिएटरमध्ये निघून गेले.
जया बच्चन यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर अनेकजण कमेंट करताना दिसत आहे. “याच कारणामुळे आम्हाला रेखा आवडतात. त्या अजिबात भडकत नाही आणि अॅटिट्यूडही दाखवत नाहीत”, असे एकाने कमेंट करत म्हटले आहे. “त्या शाळेची मुख्याध्यापिका असल्याप्रमाणे वागतात”, अशी कमेंट एकाने केली आहे. “हिच्याबरोबर ऐश्वर्या कशी राहत असेल”, असे एकाने कमेंट करत विचारले आहे.
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाबद्दल बोलायचे तर, हा चित्रपट येत्या २८ जुलैला प्रदर्शित होणार असून चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहर करत आहे, तर चित्रपटात मुख्य भूमिकेत आलिया भट्ट आणि रणवीर सिंहसोबत जया बच्चन, धर्मेंद्र, शबाना आझमी, क्षिती जोग हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. कौटुंबिक नाट्य, रोमान्स, डान्स असलेला हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक फारच उत्सुक आहेत.