Wednesday, September 9, 2026
Homeब्रेकिंग न्यूजJyoti Chandekar : अभिनेत्री ज्योती चांदेकर अनंतात विलीन; मुलगी तेजस्विनी पंडितने दिला...

Jyoti Chandekar : अभिनेत्री ज्योती चांदेकर अनंतात विलीन; मुलगी तेजस्विनी पंडितने दिला मुखाग्नी

मुंबई | Mumbai

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर (Actress Jyoti Chandekar) यांचे शनिवारी (दि.१६) रोजी वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झालं. त्यानंतर आज रविवारी (दि.१७) रोजी पुण्यामध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात आले. अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिच्या ज्योती चांदेकर या आई होत्या. तेजस्विनी पंडित हिनेच ज्योती चांदेकरांच्या अंत्यसंस्काराचे सर्व विधी केले.

- Advertisement -

अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी अलीकडेच ‘ठरलं तर मग’ मालिकेचे महासंगम स्पेशल शूट पूर्ण केले होते. मालिकेच्या निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांनी शेअर केलेल्या पोस्टनुसार, त्या अलीकडेच काही दिवसांची सुट्टी घेऊन पुण्यात गेल्या होत्या. त्यानंतर थेट त्यांच्या निधनाचेच (Death) वृत्त आले.

आईचे निधन झाल्यानंतर अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Actress Tejaswini Pandit) हिने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली होती. तेजस्विनीने, “मनमुराद जगणारी आणि दिलखुलास हसणारी आमची आई तसेच सर्वांची लाडकी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती ज्योती चांदेकर पंडित यांचे वयाच्या ६९ वर्षी १६ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले”, असे आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते.

ज्योती चांदेकर यांनी वयाच्या १२ व्या वर्षी आपल्या सिनेक्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर पुढील पाच दशकांत त्या महाराष्ट्रातील घराघरात पोहोचल्या आणि लोकप्रिय देखील झाल्या.’ठरलं तर मग’ या मालिकेत त्यांनी साकारलेली पूर्ण आजीची भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायमची घर करून राहिली.याशिवाय त्यांनी धर्मकन्या, ढोलकी, पाऊलवाट, गुरु यांसारख्या अनेक चित्रपटांत (Movie) देखील काम केले.

दरम्यान, ज्योती चांदेकर यांच्या पार्थिवावर पुण्यातील नवी पेठ वैंकुठ स्मशानभूमी याठिकाणी १२ वाजून ५ मिनिटांनी विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तेजस्विनीला धीर देण्यासाठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार उपस्थित होते. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे देखील ज्योती यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप पुरस्काराने गौरव

0
मुंबई | वृत्तसंस्था जगभरातील नेत्यांच्या आवाजाने दुमदुमलेल्या ब्रिटनच्या संसदेतील वरिष्ठ सभागृह हाऊस ऑफ लॉर्डसमध्ये आज ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. निमित्त होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना...