Monday, April 28, 2025
Homeमनोरंजनकाय सांगता? 'या' प्रसिध्द अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपुडा

काय सांगता? ‘या’ प्रसिध्द अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपुडा

मुंबई : ‘फॉर मोर शॉट्स’ या वेब सीरिजमधिल मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्री मानवी गागरू हिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमुळे आता तिच्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. या फोटोत ती एकटी बसलेली दिसत असली तरी, त्यामागे ती काहीतरी दुसरच सांगू पाहत आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

चाहते तिचा हा फोटो बघून वेगवेळ्या प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. इंस्टाग्रामवरील त्या पोस्टनुसार ती आता सिंगल राहिली नाही असे सांगू पाहत आहे. मानवी गागरू हिने ती एंगेज (Engaged) झाली असे सांगितले आहे. रेड हार्ट इमोजी शेअर करत,  मानवी तिची एंगेजमेंट रिंग दाखवत हसत आहे.

- Advertisement -

सावधान! केळी खाताय? आधी ‘हा’ व्हिडीओ पाहा…

मानवी गागरू (Maanvi Gagroo)  हिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत एकप्रकारे चाहत्यांना साखरपुडा झाल्याची माहिती दिली. या फोटोमध्ये मानवीच्या हातामध्ये साखरपुड्याची रिंग दिसत आहे. आता मानवीचे हे फोटो (Photo) सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. मानवी गागरू हिला ट्रिपलिंग या वेब सीरिजमधून खरी ओळख मिळाली. मानवीच्या साखरपुड्याची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर चाहते मानवीचे अभिनंदन करताना दिसत आहेत.

ताशी १२० किमी वेग, एकाच उडीत ‘त्याने’ कापले तब्बल २२ फूट अंतर; पाहा Viral Video

मानवी गागरू हिने साखरपुडा झाल्याची घोषणा केली असली तरी, अजून तिने हे जाहिर केले नाही की, तिने साखरपुडा नेमका कोणासोबत केला. याविषयी गोपनीयता ठेवली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...