मुंबई | Mumbai
बॉलीवूड मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी बुधवारी मुंबईत आत्महत्या करत आयुष्य संपवलं आहे.
प्राथमिक माहितीनुसार मुंबईतील वांद्रे इथं असणाऱ्या इमारतीतून उडी घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं. वांद्र्यातील अल्मेडा पार्क असं या इमारतीचं नाव सांगण्यात येत आहे.
दरम्यान, मलायकाचे वडील अनिल अरोरा यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं यामागचं कारण अद्यापही अस्पष्ट असून, आता पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
अभिनेत्री मलायका आरोरा कामानिमित्त पुण्याला गेली होती. वडिलांच्या निधनाबाबतची माहिती मिळताच तातडीने ती मुंबईसाठी रवाना झाल्याचं समजतेय.
त्याशिवाय अनिल अरोरा यांच्या निधनाची माहिती मिळताच अरबाज खान तात्काळ अरोरा कुटुंबियांच्या घरी दाखल झालाय. अरबाज खान अरोरा कुटुंबांना धीर देण्यासाठी गेल्याचं समजतेय.