Thursday, April 3, 2025
Homeमनोरंजन'शीतल' पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘शीतल’ पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई | Mumbai  

अभिनेत्री शिवानी बावकर (Shivani Baokar) यांनी ‘लागीर झालं जी’ या मालिकेतून छोट्या पडद्यावरील सादरीकरणातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. शिवानी आता पुन्हा नवीन प्रकल्पासह आपल्या चाहत्यांच्या भेटीला येत आहेत.

- Advertisement -

शिवानी बावकर झी मराठीवर (Zee Marathi) ‘लवंगी मिरची’ या आगामी मालिकेतुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेबाबत बोलताना बावकर म्हणाली की, ‘लवंगी मिरची हे शीर्षकच माझ्या व्यक्तिरेखेबद्दल (characters) बोलत आहे. जशी लवंगी मिरची खूप तिखट असते आणि जे पात्र ‘अस्मी’ मी साकारत आहे ते देखील खूप तिखट असल्याचे तिने म्हटले.

तसेच पुढे भूमिकेविषयी बोलताना शिवानी बावकर म्हणाली की, या मालिकेत मी अस्मी नावाची भूमिका साकारत आहे. तिची आई हे तिचं जग आहे. ती तिच्या आईच्या बाजूने उभी राहण्यास कधीही चुकत नाही, ती नेहमीच तिच्या आईचे रक्षण करते. तिची आई स्वभावाने अतिशय निरागस (innocent) आहे.आईने स्वतःची एक खानावळ उभी केली आहे. तिच्या आधीच्या प्रवासात तिला खूप अडथळे आले, तिला तीन मुली आहेत तरीही तीने एकटीने स्वकर्तृत्वावर खानावळ उभी केली.

याशिवाय आई निरागस असल्यामुळे लोक तिचा गैरफायदा घेऊ शकतात, तिला काहीही बोलू शकतात, अस्मी तिथे आहे म्हणून तिची आई आणि तिच्या दोन बहिणींना काळजी नाही,कारण त्यांना माहित आहे की घरात कोणीतरी आहे जो त्यांचे रक्षण करेल. अशी झटकेदार मालिका घेऊन येताना शिवानी बावकर म्हणतात, “लवंगी मिरची” ही नवीन मालिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे असे तिने सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : नशेच्या गोळ्या व इंजेक्शन्सची विक्री करणारा तरुण गजाआड

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur नशेच्या गोळया व इंजेक्शन्सची विक्री करणार्‍या तरुणाला श्रीरामपूर शहर पोलीसांनी अटक केली.त्यांच्याकडून नशेच्या गोळ्या व इंजेक्शनच्या औषधी बाटल्या तसेच 16 मोबाईल जप्त...